Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमध्ये किंचित घट तर 254 मृत्युमुखी झाले

Webdunia
मंगळवार, 8 जून 2021 (22:31 IST)
मंगळवारी राज्यात कोविड19 चे 10891 नवीन रुग्ण आढळले आणि गेल्या 24 तासांत 295 लोकांचा मृत्यू झाला.10 हजारहुन अधिक नवीन प्रकारणांसह राज्यात एकुण संक्रमितांचा आकडा 58,52,891 वर गेला आहे. आणि मृतकांचा आकडा 1,01,172 वर गेला आहे. सोमवारी राज्यात संक्रमणाची 10,891 प्रकरणे नोंदली गेली आणि 154 लोक मृत्युमुखी झाले आहे.   

रुग्णालयातून 16,577 रुग्णांना सोडण्यात आल्याने आतापर्यंत 55,80 925 लोक बरे झाले आहेत.सध्या राज्यात 1,67,927 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, कोविड 19 साठी गेल्या 24 तासांत 2,11,042 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.राज्यात आतापर्यंत एकूण 3,69,07,181 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. 
 
मृत्यूच्या 295 घटनांपैकी 208 प्रकरणे गेल्या 48 तासांत आणि गेल्या आठवड्यात 87 घटना घडल्या. जुन्या आकडेवारीशी जुळवून घेण्याच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून आरोग्य विभागाने मृत्यूच्या 407 घटनांची भर घातली आहे. हे सर्व मृत्यू गेल्या आठवड्यात झाले. अशाप्रकारे मंगळवारी मृतांच्या संख्येत आणखी 702 मृतांची भर पडली.
 
मुंबईत सर्वाधिक 682 रुग्ण आढळले आणि सात लोकांचा मृत्यू झाला. मुंबईत संक्रमित होणाऱ्यांची एकूण संख्या 7,12,055 वर गेली आहे आणि मृतांचा आकडा 15,006 झाला आहे. मुंबईत 28 मार्चनंतर  मृत्यूचे प्रमाण कमी आहे. या काळात नाशिक विभागात संसर्गाच्या  953 घटना नोंदल्या गेल्या.
 
महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील कोविड 19 मुळे आतापर्यंत 1504 मुले अनाथ झाले आहेत. मंगळवारी या अधिकाऱ्याने  सांगितले की,साथीचा रोगात अनाथ झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. हे सर्वेक्षण आशा कामगार, स्थानिक प्रशासकीय संस्था, आरोग्य विभाग आणि इतर सरकारी एजन्सीद्वारे करण्यात आले ज्यामध्ये कोविड -19 प्रकरणांचा डेटा होता.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

ओवेसींच्या वक्तव्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिउत्तर

फडणवीस मुस्लिम समाजाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे-ओवेसी

यवतमाळमध्ये बॅगची झडती घेतली म्हणून उद्धव ठाकरे संतापले

Maharashtra Live News Today in Marathi पंतप्रधान मोदी आज चिमूर-सोलापूर आणि पुण्यात सभेला संबोधित करणार

उद्धव ठाकरेंची मशाल घरांमध्ये आग लावत आहे, मुख्यमंत्री शिंदे अस का म्हणाले?

पुढील लेख
Show comments