rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुन्हा नाशिकात लसीकरण बंद

Vaccination stopped again in Nashik maharasthra news coronavirus news in marathi webdunia marathi
, रविवार, 4 जुलै 2021 (11:23 IST)
नाशिक: शहरात उद्या (दि ४) रोजी संपूर्ण लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून नाशकात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद पडले होते. काल (दि ०२) रोजी नाशिक जिल्ह्यासह शहराला ५७ हजार लसी प्राप्त झाल्या. यानंतर आज (दि ०३) रोजी सकाळपासून जिल्ह्याच्या विविध भागांसह शहरात लसीकरण पार पडले....
 
शासकीय अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार दोन दिवस पुरेल इतका लसींचा साठा नाशिकला मिळाल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले होते. त्यामुळे या आठवड्यात रविवारीदेखील लसीकरण सुरु राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, उद्या पूर्णदिवस लसीकरण बंद राहणार आहे.
 
तसेच उद्या सायंकाळी जर लसींचे आणखी डोस नाशिकला प्राप्त झाले तर पुन्हा एकदा सोमवारपासून (दि ५) लसीकरणा नव्या दमाने सुरु करण्यात येणार आहे. सोमवारच्या लसीकरणाबाबतची माहिती उद्या रात्रीपर्यंत मिळणार आहे.
 
तसेच उद्या (दि ०४) रोजी लसीकरण बंद असल्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही आवाहन मनपा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मिताली राजचा नवीन विक्रम, कसा होता भरनाट्यमपासून क्रिकेटच्या मैदानापर्यंतचा प्रवास?