Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

‘झूम’एपच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

‘झूम’एपच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह
, गुरूवार, 16 एप्रिल 2020 (07:30 IST)
कोरोना विषाणूचे (Coronavirus) संकट आणि त्यानंतर सुरु झालेल्या लॉक डाऊन (Lockdown) दरम्यान, लोकप्रिय झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म झूमच्या (Zoom App) गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याबाबतचा एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये या App मधून वापरकर्त्यांची माहिती लीक झाल्याचे समजत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 500,000 हून अधिक झूम वापरकर्त्यांचे पासवर्ड आणि उर्वरित खात्याशी संबंधित तपशील एका अगदी कमी किंमतीमध्ये झार्क वेबवर विकले जात आहेत. डार्क वेबवरील माहिती ही क्रेडेंशिअल स्टफशी निगडीत आहे आणि वेगवेगळ्या सर्विसेसमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरकर्त्यांचा लीक केलेला डेटा वापरला गेला आहे.

1 एप्रिल रोजी एका सायबर सिक्युरिटी फर्मच्या हॅकर फोरममध्ये निदर्शनास आले की, झूम खात्याचा तपशील डार्क वेबवर विकला जात आहे. कंपनीला आढळले की 530,000 वापरकर्त्यांचा तपशील $ 0.002 (सुमारे 15 पैसे) मध्ये विकला जात आहे. एवढेच नव्हे तर अनेक खात्यांचा तपशील विनामूल्य शेअर केला जात आहे. वैयक्तिक माहितीच्या URL पासून ते ईमेल, पासवर्ड शेअर केले जात आहेत. Cyble नावाच्या सायबरसुरक्षा कंपनीने हा फोरम शोधला आणि BleepingComputer ने हा रिपोर्ट केला. अशात वापरकर्त्यांना त्यांचे झूम पासवर्ड त्वरित बदलण्याचा सल्ला दिला जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयुष मंत्रालयाचा सल्ला : हर्बल टी तुम्ही ट्राय केलात का