Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

AFG vs NED: अफगाणिस्तानची विजयाची हॅट्रिक, उपांत्य फेरीसाठी वाढली चुरस

Webdunia
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (23:22 IST)
अफगाणिस्ताननं वन-डे विश्वचषक स्पर्धेतील विजयाची हॅटट्रिक पूर्ण केलीय. लखनौमध्ये झालेल्या सामन्यात त्यांनी नेदरलँड्सचा 7 विकेट्सनं पराभव केला.
नेदरलँड्सनं दिलेलं 180 धावांचं आव्हान त्यांनी 31.3 ओव्हर्समध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. हा अफगाणिस्तानचा सलग तिसरा आणि गेल्या पाच सामन्यातील चौथा विजय आहे.
 
या विजयानंतर अफगाणिस्तानचे सात सामन्यानंतर आठ पॉईंट्स झाले असून त्यांनी पॉईंट टेबलमध्ये पाकिस्तानला मागं टाकत पाचवा क्रमांक पटकावलाय.
 
मिडल ऑर्डरकडून मोहीम फत्ते
पाकिस्तान आणि श्रीलंकाविरुद्ध झालेल्या सामन्याप्रमाणे नेदरलँड्सविरुद्धही मिडल ऑर्डरनं अफगाणिस्तानच्या विजयाची जबाबदारी पूर्ण केली.
 
रहमत शहानं या स्पर्धेतील सलग तिसरं अर्धशतक झळकावत 52 धावा केल्या. कर्णधार हशमतउल्ला शाहिदीनंही या स्पर्धेतील फॉर्म कायम राखला.
 
हशमतउल्लानं 64 बॉलमध्ये नाबाद 56 धावा करत अफगाणिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अझमत ओमारझाईनं नाबाद 31 धावा करत आपल्या कर्णधाराला भक्कम साथ दिली.
 
उपांत्य फेरीसाठी चुरस
पहिल्या दोन विश्वचषकात मिळून फक्त एक सामना जिंकणाऱ्या अफगाणिस्तानला यंदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची मोठी संधी आहे.
 
अफगाणिस्तानचे आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका विरुद्धचे सामने बाकी आहेत. हे दोन्ही सामने त्यांनी जिंकले तर 12 पॉईंट्ससह उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतात.
अफगाणिस्ताननं उर्वरित दोनपैकी एक सामना जिंकला तरी त्यांना उपांत्य फेरीची संधी आहे. मात्र त्यासाठी त्यांना अन्य सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.
 
यजमान भारतानं उपांत्य फेरीतील जागा निश्चित केलीय. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचाही प्रवेश जवळपास नक्की आहे.
 
अंतिम चारमधील उर्वरित दोन जागांसाठी अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या चार संघात चुरस आहे.
 
नेदरलँड्सची खराब सुरूवात
त्यापूर्वी नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय यशस्वी ठरला नाही.
 
मुजीब उर रहमाननं पहिल्याच ओव्हरमध्ये वेस्ली बारेसीला बाद कर अफगाणिस्तानला पहिलं यश मिळवून दिलं.
 
वेस्ली बाद झाल्यानंतर मॅक्स ओ’ ड्वोड आणि कॉलिन एकरमन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागिदारी करत नेदरलँड्सची इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला.
 
4 जण धावबाद
ओ’ ड्वोड आणि एकरमन ही जोडी जमत असताना अफगाणिस्तानला त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी सामन्यावर वर्चस्व मिळवून दिलं.
 
अझमत ओमरझाईनं सुरूवातीला ओ’ड्वाड (42) याला धावबाद करत ही जोडी फोडली. त्यापाठोपाठ कॉलिन एकरमन (29) आणि कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (0) झटपट धावबाद झाल्यानं नेदरलँड्सची अवस्था 4 बाद 92 अशी झाली.
 
नेदरलँड्सचा संघ या धक्क्यातून सावरलाच नाही. सायब्रँड् एंजलब्रेख्तनं अर्धशतक झळकावत ही पडझड सावरण्याचा प्रयत्न केला. पण तो देखील 58 धावांवार धावबाद झाला.
 
नेदरलँड्सच्या टॉप पाचमधील चार फलंदाज धावबाद झाले.
 
अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं 3 विकेट्स घेतल्या. नूर अहमदनं 2 तर मुजीब उर रहमाननं 1 विकेट घेतली.
 








Published By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

IND vs SA: संजू सॅमसन T20 मध्ये सर्वात जलद सात हजार धावा पूर्ण करणारा सहावा भारतीय ठरला

भारताने दक्षिण आफ्रिकेवर 61 धावांनी विजय मिळवला

हारिस रऊफने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास

Champions Trophy 2025 : टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही

IND vs SA: पहिल्या T20 मध्ये नजरा अभिषेक-संजूवर, संभाव्य प्लेइंग11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments