Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs NZ: शुभमन गिलने ODI मध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विश्वविक्रम केला

Webdunia
सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (07:17 IST)
भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध विश्वविक्रम केला. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघ सामना खेळत आहेत. यादरम्यान शुबमन गिल वनडेमध्ये दोन हजार धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने सर्वात कमी डावात ही कामगिरी केली आहे. या प्रकरणात गिल दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमला आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसह अनेक खेळाडूंच्या पुढे गेला आहे.
 
डेंग्यूमुळे उशिरा विश्वचषकात पदार्पण करणारा गिल पहिले दोन सामने खेळू शकला नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने दमदार पुनरागमन केले. त्याला दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी 14 धावांची गरज होती. सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ट्रेंट बोल्टला चौकार मारून गिलने आपल्या दोन हजार धावा पूर्ण केल्या. गिलने आपल्या 38व्या एकदिवसीय डावात दोन हजार धावांचा आकडा पार केला. हाशिम आमलाने 40 डावात ही कामगिरी केली. 
 
तर शुभमन गिलने वयाच्या 24 वर्षे 44 दिवसांत वनडे फॉरमॅटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या. दोन हजार धावा पूर्ण करणारा तो भारताचा पाचवा सर्वात तरुण खेळाडू आहे. या बाबतीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. वयाच्या 20 वर्षे 354 दिवसात त्याने ही कामगिरी केली. युवराज सिंगने वयाच्या 22 वर्षे 51 दिवस, कोहलीने 22 वर्षे 215 दिवस आणि सुरेश रैनाने 23 वर्षे 45 दिवस वयात ही कामगिरी केली. 
 
 
 
 






Edited by - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

IND vs BAN: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास,सुनील गावस्करांचा रेकॉर्ड मोडला

Legends League Cricket : लेजेंड्स लीग क्रिकेटच्या सर्व सामन्यांचे तपशील जाणून घ्या

दुलीप ट्रॉफीमध्ये शून्यावर बाद झालेला श्रेयस अय्यर पुन्हा फ्लॉप झाला

बांगलादेशविरुद्ध चेपॉकच्या मैदानात केएल राहुल नक्की येणार, कर्णधाराकडून हिरवा सिग्नल

आयसीसी कडून महिलाT20 विश्वचषक 2024 साठी बक्षीस रक्कम जाहीर

पुढील लेख
Show comments