Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रचिन रवींद्र सचिनचा 27 वर्ष जुना विक्रम मोडून सर्वाधिक धावा करण्यात अव्वल स्थानी

rachin ravindra
, शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (15:06 IST)
विश्वचषक 2023 चा उत्साह हळूहळू वाढत आहे. उपांत्य फेरीतील चार संघ जवळपास निश्चित झाले आहेत. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आधीच पात्र झाले आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंडचेही अंतिम चारमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित मानले जात आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसाठी जे समीकरण तयार केले जात आहे ते जवळपास अशक्य आहे.गुरुवारी न्यूझीलंडने श्रीलंकेला हरवून आपला दावा मजबूत केला आहे.

रचिन रवींद्र ने नऊ सामन्यांच्या नऊ डावांमध्ये 70.62 च्या सरासरीने 565 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 108.45 राहिला आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तो सध्या अव्वल स्थानावर आहे. रचिनने महान सचिन तेंडुलकरचा 27 वर्ष जुना विक्रमही मोडला. 25 वर्षांचा होण्यापूर्वी एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू बनला आहे. रचिन सध्या 23 वर्षांचा आहे. 

सचिनने 1996 च्या विश्वचषकात 523 धावा केल्या होत्या. त्यावेळी सचिनही 23 वर्षांचा होता. या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाबरने 2019 च्या विश्वचषकात 474 धावा केल्या होत्या.
 
रचिन रवींद्रच्या नावावर त्याच्या पहिल्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आहे. या बाबतीत त्याने जॉनी बेअरस्टोचा चार वर्षे जुना विक्रम मोडला. बेअरस्टोने 2019 मध्ये पहिला विश्वचषक खेळला आणि 11 सामन्यांमध्ये 48.36 च्या सरासरीने 532 धावा केल्या. यामध्ये दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
 
 रचिनने आतापर्यंत तीन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. रचिनने गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध 42 धावांची इनिंग खेळली. त्याने 10 धावा करताच बेअरस्टोला मागे सोडले.
बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे.
 
रचिन हा एकाच विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्यांमध्ये  तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर पाच शतकांसह विश्वचषकात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम आहे. त्याचबरोबर कुमार संगकारा आणि क्विंटर डी कॉक यांनी संयुक्तपणे प्रत्येकी चार शतके झळकावली आहेत. रचिन रवींद्र तीन शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. रचिनची खास गोष्ट म्हणजे तो डावखुरा स्फोटक फलंदाज असण्यासोबतच तो एक उत्कृष्ट डावखुरा फिरकी गोलंदाजही आहे. 
















Edited by - Priya Dixit       
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Firecrackers Ban देशभरात फटाक्यांवर बंदी, सर्वोच्च न्यायालयाने मागील आदेशाचा पुनरुच्चार केला