देवतेच्या तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. देवतेची तारक व मारक अशी दोन रूपे असतात. देवतेप्रति सात्त्विक भाव निर्माण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो, तर देवतेकडून शक्ती व चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारक रूपाचा नामजप आवश्यक असतो.
दत्ताचा तारक-मारक संयुक्त नामजप योग्य उच्चारासह कसा करावा, हे सांगितले आहे.
नामजपाची योग्य पद्धत
श्री गुरुदेव दत्त ।
या नामजपातील गुरुदेव हा शब्द म्हणताना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा. गुरुदेव या शब्दानंतर थोडा वेळ थांबून दत्त हा शब्द म्हणावा. तो म्हणताना द वर जोर द्यावा.