Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय २६

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय २६
वेद केवळ म्हणावया । हो सायास ऋषिवर्या । कलियुगीं अल्पायुष्यां । केवीं आग्नायांतीं गती ॥१॥
चिरंजीव भरद्वाज । ब्रह्मा पुसे वेदगुज । तीन राशी दावी अज । ऋषी लाजला तेधवा ॥२॥
दे देव मुष्टी तीन । न तया आले अजून । हे अनंत वेद जाण । विभागून ठेविले तूर्त ॥३॥
विष्णू भूतळीं व्यासरुपी । चौशिष्यां चार निरुपी । वेद शाखा विभागरुपी । पैला निरुपी ऋग्वेद ॥४॥
शुद्धांतः करणें पैला । ऐक सांगो ऋग्वेदाला । द्वरत्‍निमात्र रुप त्याला । व्यक्तगळा दीर्घदृष्टी ॥५॥
रवि समान कांति ज्यांची । अत्रीगोत्र देवता ज्याची । ब्रह्मा गायत्री छंदची । आयुर्वेदचि उपवेद ॥६॥
शाखा नामें भेद पांच । सहा अंगें ब्राह्मणच । अरणेंशीं हो वेदच। पैलासच व्यास सांगे ॥७॥
शिष्य तयाचा दुसरा । वैशंपायन नामें बरा । तया यजुर्वेद दुसरा । सांगे बरा विभागून ॥८॥
सुमनः प्रीती जो यजनें । करी पंचारत्‍नी मानें । भारद्वाज गोत्र जाणें । कृशपणें त्रिष्टुप्‌छंद ॥९॥
दैव महा विष्णु ज्याचें । उपवेद धनु ज्याचें । सूर्याभ जो भेद त्याचे । जाण साचे श्याऐशीच ॥१०॥
सुमनः प्रीती दे स्तवनें । सामवेद अभिधानें । षड्‌रत्‍निमितमानें । जैमिनीनें घेतला हा ॥११॥
विशेष हा शांत दांत । असे चर्मदंडहस्त । गोत्र काश्यप दैवत । रुद्र ख्यात जगतीछंद ॥१२॥
जो ओष्ठा रक्त असे । याच्या भेदा मिती नसे । ज्याचा उपवेद असे । गंधर्व असें सांगे व्यास ॥१३॥
भुवनीं सांग भेद याचे । कोण बोलेल वाचे । सांगोपांग वदतां वाचे । शेषाचेही ये शीण ॥१४॥
अतींद्रिय ज्ञाता व्यास । ऐक म्हणे सुमंतूस । सांगे अथर्ववेदास । हो देवेश देव त्याचा ॥१५॥
असे याचा उपवेद । अस्त्र वेद तिसरा छंद । गोत्र बैजान स्वछंद । नऊभेद कल्प पांच ॥१६॥
हे कोणि चारही पूर्ण । एवढे न जाणिले जाण । एक शाखा ही अपूर्ण । तुम्ही पढून सर्वज्ञ कीं ॥१७॥
जे विप्र धर्मयुक्त । विष्णु मानी त्यां दैवत । वेदबळें हस्तगत । तयां होत देवादिक ॥१८॥
जे स्वकृत्या सोडुनी देती । ग्लेच्छापुढें वेद पढती । ब्राह्मणातें जिंकिती । ते होती ब्रह्मराक्षस ॥१९॥
इति०श्री०प०वा०स०वि० सारे चतुर्वेदकथनं नाम षड्‌विंशो०

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय २५