Marathi Biodata Maker

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय ४५

Webdunia
ऐकें ईश्वर प्रभाव । नंदिनाम एक भूदेव । कुष्ठें व्यापुंनि घे धांव । देवीपाशी तुळजापुरीं ॥१॥
त्या ईश्वरीजा गुरुपाशीं । म्हणें, तो बोलेकां नरापशीं । धाडिसी, मग भोपे यांसीं । सांगून त्यांसी घालविलें
धी पुरःसर नावडता । तो ये भेटे गुरुनाथा । गुरु म्हणे तूं कां आतां । आलास रे नरापाशीं ॥३॥
स्वकीय खूण ओळखून । तो प्रार्थी त्या देव मानून । गुरु मह्णे पापें करुन । कुष्ठें व्यापून गेलासी ॥४॥
अकस्मात् पाप हो दूरी । या संगमीं स्नान तूं करीं । म्हणोनी त्याबरोबरीं । सोमनाथासी धाडिती ॥५॥
तो त्याक्षणीं स्नान करी । अश्वत्था प्रदक्षिणा करीं । मठीये त्या अवसरीं । पाहें शरीरीं गुरु म्हणे ॥६॥
शरीर त्याचे दिव्य झालें । किंचित् जंघेसी राहिलें । पुसे कुष्ठ हें कां राहिलें । गुरुबोले विकल्पानें ॥७॥
त्वांजीमनुष्यधी धरिली । तीच तूज आड आली । माझी स्तुती करीं भली, म्हणेतोलिखितही नेणे ॥८॥
विभूती मग जिव्हेवर । टाकूनी, गुरु म्हणे स्तोत्र । करीं, मग तो होयी धीर । करी स्तोत्र श्रीगुरुचें ॥९॥
आत्मा तो तूं सर्वाधीश । शुद्ध बुद्ध नित्य त्रीश । तुला नेणुनि कर्मपाशें । बद्ध होती जीव अज्ञाने ॥१०॥
ते अहंकारें त्रिविध । पापें, घेती योनी विविध । समपापपुण्यें त्रिविध । नर होती रक्तरेतें ॥११॥
गर्भी महाकष्ट भोगी । सोडवाया प्रार्थी विरागी । उपजतां वेगीं । पुढें भोगी होउनि मरे ॥१२॥
त्वद्वीक्षणा विना कैसा । मोक्षा जाईल हा पिसा । तूंची कृपा करी ऐसा । प्रार्थीमानसां स्थिरावून ॥
गेलें राहिलेलें कुष्ठ । जहाला तो गुरुप्रेष्ठ । कविता करी कविश्रेष्ठ । एकनिष्ठ गुरुपदीं ॥१४॥
इति श्री०प०प०वा०स०वि सारे ब्राह्मणकुष्ठनिवारणं नाम पंचचत्वारिंशो०

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

आरती शुक्रवारची

हनुमानाची प्रतिमा लावण्यासंबंधीचे काही नियम आहे, ज्याबद्दल बहुतेक भक्तांना माहिती नसते...

Eid-ul-Adha 2026 Wishes in Marathi ईद-उल-अधाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

पुढील लेख