Marathi Biodata Maker

श्रीदत्त उपनिषद - अध्याय तिसरा

Webdunia
प्राप्त व्हावया ब्रह्मज्ञान । अति गुह्य आहे अनुष्ठान । सोऽहम्‍ हंसाचे साधन । सावधान जो साधी ॥१॥
प्राणाचेनि गमनागमने । सोऽहम्‍ हंसाचेनि स्मरणे । सावधाने जो साधू जाणे । तेणे पावणे हे स्थान ॥२॥
त्यासीच पवनजयो घडे । तोचि आज्ञाचक्रामाजी चढे । तेथोनिही मार्ग काढी पुढे । अति निवाडे अचूक ॥३॥
सोऽहम्‍ हंसा ब्रह्म । ऐसे करावे गायन । कूटस्थी ठेवावे मन । ब्रह्मपद तो पावे ॥४॥
कूटस्थी ठेविता मन । प्राण करी उर्ध्वगमन । तेथोनी पुढे महाशून्य । मार्ग आपैसे मिळतसे ॥५॥
समूळ नासता देहभान । निर्विकल्प होई मन । हेचि समाधि साधन । सोऽहम्‍ ध्यानी साधावे ॥६॥
होता चिदाकाश दर्शन । स्थिर करावे तेथे मन । हे परब्रह्माचे साधन । सावधान साधावे ॥७॥
जाहलिया आनंद पद प्राप्त । चिदाकाशचि दिसे समस्त । चिदाकाशी चित्त । अति सावचित्त ठेवावे ॥८॥
चिदाकाश चित्त चिंतन । हेही सांडोनि भेद ध्यान । स्वये चिदात्मा होऊन । परमानंदी राहातसे ॥९॥
प्रथम शून्य रक्त वर्ण । त्याचे नांव अधः शून्य । उर्ध्व शून्य श्वेत वर्ण । मध्य शून्य श्यामवर्ण ॥१०॥
महाशून्य नीलवर्ण । त्यात स्वरुपचि केवळ । चारी वाचा कुंठीत झाली । सोऽहम्‍ ज्योत प्रकाशली ॥११॥
रक्त वर्ण त्रिकूट जाण । श्रीहाट श्वेत वर्ण । गोल्हाट श्याम वर्ण । औटपीठ नील वर्ण ॥१२॥
वरी भ्रमर गुंफा आहे । दशमद्वारी दत्त राहे । भेदिता नवद्वाराते । दत्त दर्शन होतसे ॥१३॥
निर्विचार निर्विकल्प निश्चिंत । होवोनी राहावे सावचित्त । चित्त होता कल्पनातीत । ब्रह्मज्ञान होतसे ॥१४॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Ganga Dussehra 2026 गंगा दशहरा कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, १० पापांपासून मुक्ती आणि पूजेची विधी

Ganga Dussehra 2026 Wishes in Marathi गंगा दशहरा शुभेच्छा संदेश

सोमवारी पूजा करताना महादेवाच्या या मंत्राचा जप करावा

Mahadev Aarti शंकराची आरती : लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

आरती सोमवारची

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments