धार्मिक शास्त्रांप्रमाणे देवी लक्ष्मीची पूजा केल्याचे फल तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा पूजा पाठ नियमाने केली जाते. पूजेत काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे कारण देवी लक्ष्मी काही चुकांमुळे नाराज होऊ शकते तर जाणून घ्या काळजी घेण्यासारख्या गोष्टी-
तुळशीचे पान अर्पित करू नये
प्रभू विष्णूंना तुळस प्रिय आहे परंतू देवी लक्ष्मीला तुळशीपासून द्वेष आहे कारण तुळस विष्णूंच्या दुसर्या स्वरूप शालिग्रामाची पत्नी आहे. या नात्याने तुळस देवी लक्ष्मीची सवत आहे म्हणून लक्ष्मी पूजेत तुळस वर्ज्य आहे.
दिवा डावीकडे ठेवू नये
देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी दिव्याच्या वातींचा रंग लाला असावा आणि दिवा उजव्या बाजूला ठेवावा. कारण प्रभू विष्णू अग्नी आणि प्रकाश स्वरूप आहे. त्यामुळे दिवा उजव्या बाजूला ठेवणे योग्य ठरेल.
पांढरे फूल अर्पित करू नये
लक्ष्मी देवी सवाष्ण असून त्यांना नेहमी लाल रंगाचे फुलं किंवा त्यांचे प्रिय कमळ अर्पित करावे.
प्रभू विष्णूंची पूजा करणे विसरू नका
देवी लक्ष्मीची पूजा तोपर्यंत यशस्वी ठरणार नाही जोपर्यंत त्यांच्यासोबत प्रभू विष्णूंची पूजा केली जात नाही. म्हणून दिवाळीच्या रात्री पूजा करताना गणपतीची पूजा करून देवी लक्ष्मी आणि प्रभू विष्णूंची पूजा करावी.
दक्षिण दिशेत ठेवा प्रसाद
देवी लक्ष्मीची पूजा करताना प्रसाद नेहमी दक्षिण दिशेकडे ठेवावा आणि फुलं आणि बेलपत्र समोर ठेवावे.