पावली.... अर्थात दिव्यांच्या उत्सव. मनामनातील, वातावरणातील अंधकाररूपी दु:ख, काळजी, उद्वेग दूर करता सौख्याचा, भरभराटीचा प्रकाश सर्वत्र पसरवणरा हा दिव्यांचा सण. 'दीपज्योती नमोऽस्तुते' असं शुभंकरोतीमध्येही म्हटल्या जाते. प्रकाशाचा महिमाच हा असा सुंदर, आनंदी. दिवाळीचं एक वेगळचं वातावरण असतं. काळ बदलला, घरं बदलली, साहजिकच सणांचं स्वरूप बदललं. पण वाडा असो व चाळ, बंगला असो व फ्लॅट- सारं काही उजळवून टाकण्यासाठी, प्रकाशित करण्यासाठी 'पणती' हवीच. मंद, शांत ठेवणार्या पणतीच्या प्रकाशाने जी तृप्तता जाणवते, ती लाईटच्या माळांच्या लखलखाटात जाणवत नाही, हे नक्की म्हणूनच....
इंद्रधनूषच्या रंगांनी सजविते अंगणी रांगोळी ठेवूनी त्यात इवलीशी पणती
प्रकाशतल्या अनेक ज्योती... असं दिवाळीचं सार्थ वर्णन केलं जातं ते काही उगीच नाही.
घराच्या दारात पणती लावण्यापेक्षा अशा पणत्यांच्या दीपमाळा लावण्याकडे अधिक कल आहे. विवधि आकर्षक आकारांतील पणत्यांची मागणीही सतत वाढतच आहे.
पणती सजवताना....
हौसेला मोल नसते हेच खरे. बाजारात आकर्षक पणत्या उपलब्ध असल्या तरी साध्या मातीच्या पणत्या बाजारातून आणून त्या रंगवण्याचं, पणत्या आकर्षक पद्धतीनं सजवण्याचं काम अनेकजण करतात. स्वत:घरी बनवलेल्या पणत्या विक्रीबरोबरच दिवाळीची खास भेटवस्तू म्हणूनही आप्तेष्टांना देता येतात.