Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Diwali 2022 : बलिप्रतिपदा /पाडवा पूजा विधी आणि महत्त्व

Webdunia
शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (23:38 IST)
कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस पाडवा म्हणून साजरा केला जातो. 
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
या दिवशी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करावी. जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी.
या दिवशी पक्वान्नांचे भोजन करावे. बळीला नैवेद्य दाखवावा.
यथाशक्ती ब्राह्मण भोजन घालावे.
बलीप्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करावे.
या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळावे.
व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते.
व्यापरी या दिवशी नव्या वह्यांचे पूजन केलं जातं. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात.
या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची देखील प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले खोचावे. 
श्रीकृष्ण, इंद्र, गायी अन् वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करावी आणि मिरवणूक काढावी.
 
बलिप्रतिप्रदेची कथा अशी
बलिराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते त्याला तो दान देत असे. दान देणे हा गुण आहे, पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा व कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे व तो शास्त्रात व गीतेने सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ नये. पण बलिराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत होऊन वाटेल तसे वागू लागतात. तेव्हा भगवान विष्णूने मुंजा मुलाचा अवतार घेतला. वामन म्हणजे लहान मुंजा मुलगा असतो व तो ओम भवति भिक्षां देही। म्हणजे भिक्षा द्या असे म्हणतो. विष्णूने वामनावतार घेतला व बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, काय हवे? तेव्हा वामनाने त्रिपाद भूमिदान मागितले. वामन कोण आहे व या दानामुळे काय होणार याचे ज्ञान नसल्याने बलिराजने त्रिपाद भूमी या वामनाला दान दिली. त्याबरोबर या वामनाने विराट रूप धारण करून एका पायाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्‍या पायाने अं‍तरिक्ष व्यापले व तिसर्‍या पाय कोठे ठेवू असे बलिराजास विचारले, तिसरा पाया आपल्या मस्तकावर ठेवा असे ‍बलिराजा म्हणाला. तेव्हा तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात घालावयाचे असे ठरवून वामनाने 'तुला काही वर मागावयाचा असेल तर माग असे बलिराजास सांगितले. तेव्हा 'आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे व आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले टाकण्याने जे सर्व घडले ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे असा त्याने वर मागितला. ते तीन दिवस म्हणजे आश्वीन कृष्ण चतुर्दशी, आमावस्या व कार्तिक शुद्ध प्रतिपदा याता बलिराज्य असे म्हणतात.
 
बलिराज्यात आपल्या मनाला वाटेल तसे लोकांनी वागावे असे धर्मशास्त्र सांगते, मात्रशास्त्राने सांगितलेली निषिद्ध कर्मे सोडून, अभक्ष्‍य भक्षण, अगभ्यागमन ही निषिद्ध कर्मे आहेत म्हणून या दिवसांत माणसे दारू उ‍‍डवितात पण दारू पीत नाहीत. शास्त्राने परवानगी दिली असल्याने परंपरेने लोक या दिवसांत मौजमजा करतात. अशीही दिवाळी बलिप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली व त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांनी पूजा करावी त्यांना मद्यमांसाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर बलिप्रीत्यर्थ दीप व वस्त्रे यांचे दान करतात. दिवाळीतला हाच दिवस प्रमुख समजला जातो. या दिवशी लोक नवी वस्त्रावरणे करून सर्व दिवस आनंदात घालवितात. या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करुन त्यावर दुर्वा व फुले खोचतात व कृष्ण, गोपाळ, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात व मिरवणूक काढतात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मत्स्यस्तोत्रम्

प्रबोधिनी एकादशी कथा

Prabodhini Ekadashi wishes 2024 in Marathi: 'प्रबोधिनी एकादशी'च्या शुभेच्छा

तुळशी मानस मंदिर वाराणसी येथे तुळशी विवाहाच्या दिवशी दर्शन घेतल्यास भाग्य लाभते

Vivah Upay हा एक उपाय प्रबोधिनी एकादशीला घरातील एका कोपर्‍यात करा, विवाह योग घडून येईल

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments