Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवाळीच्या दिवशी जुगार खेळणं चूक की योग्य, जाणून घ्या

Gambling during Diwali
, सोमवार, 9 नोव्हेंबर 2020 (10:10 IST)
भारतात ऋग्वेद काळापासून जुगार खेळण्याची पद्धत आहे. पूर्वी हे एक चौसराच्या रूपात खेळत असे पण काळानुसार यात बदल झाला आणि जेव्हा ताशांचा पत्त्यांचा शोध लागला, तेव्हा या रूपात खेळायला सुरू केले. काही लोक दिवाळीच्या दिवशी तर काही लोक अन्नकुटाच्या उत्सवात शकुनाच्या रूपाने जुगार खेळतात. ही परंपरा प्राचीन काळापासून सुरू झाली आहे. अखेर जुगार का खेळतात आणि जुगार खेळणं चूक आहे की बरोबर ?  
 
* मान्यता : अन्नकुट उत्सवाच्या काळात शकुन रूपात जुगार खेळण्याची परंपरा आहे. अन्नकुटाच्या उत्सवाला द्यूतक्रीडा दिवस देखील म्हणतात. समजूत आहे की या दिवशी जुगार खेळावे. पण बरेच लोक अज्ञानावश दिवाळीच्या दिवशीच जुगार खेळतात. दिवाळीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी जुगार खेळतात. याचे मुख्य लक्ष्य वर्षभराच्या भाग्याचे परीक्षण करणे आहे. 
 
* परंपरा सुरू कशी झाली : ही प्रथा भगवान शंकर आणि पार्वतीच्या जुगार खेळण्याच्या प्रसंगाशी जोडली आहे, या खेळात भगवान शंकर यांचा पराभव झाला होता. या संदर्भात अशी गोष्ट आहे की दिवाळीच्या दिवशी शंकर आणि पार्वती जुगार खेळले होते, तेव्हापासूनच ही प्रथा पडली. दिवाळीच्या दिवशीच शिव आणि पार्वतीने जुगार खेळल्याचे काही ही ठोस पुरावे कोणत्याही ग्रंथात आढळले नाही.
 
 
* जुगाराने सर्वांचा नाश केला: महाभारत काळात पांडव आणि कौरवांच्या मध्ये जुगाराचा खेळ झाला होता आणि पांडवाचा या मध्ये कौरवांच्या फसवणुकीमुळे पराभव झाला होता. या जुगारामुळेच राजा नल आपल्या घाती नातेवाइकामुळे आपले राज्य गमावून बसले होते. बलरामाने देखील दुर्योधन आणि शकुनीसह जुगार खेळला आणि ते त्यामध्ये पराभूत झाले. शकुनीने खेळलेल्या खेळामुळे बलरामाने सुभद्रेचे लग्न दुर्योधनाशी लावून देण्याचे होकार दिले. एकदा बलराम देखील रुक्मिसह जुगार खेळले होते आणि त्यामध्ये रुक्मीने त्यांना छळ करून पराभूत केले होते. त्या वेळी बलरामांना राग आला आणि त्यांनी रुक्मिचा वध केल्याचे उल्लेख आढळून आले आहे. कालांतराने दिसून आले आहे की जुगाराने लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.
 
जुगार एक असा खेळ आहे ज्यामुळे माणसालाच नव्हे तर देवांना देखील बऱ्याच वेळा समस्याला सामोरी जावे लागले आहे. जुगार हा सामाजिक दुष्परिणाम असून देखील भारतीय मानसिकतेत खोलपणे रुजलेला आहे. हे दुर्देवी आहे, पण दुर्दैवाने लोक शास्त्रात सांगितलेल्या चांगल्या कर्माबद्दलच्या सूचनांचे पालन लोक करत नाही आणि दुर्गुणांना त्वरितच अवलंबतात. कायदा जुगार खेळण्याची परवानगी देत नाही. म्हणून दिवाळीच्या शुभ दिनाला चुकीच्या गोष्टी करणं योग्य नाही. बऱ्याच वेळा शकुनाचा हा खेळ वाईट खेळांत बदलतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिवाळीमध्ये दम्याच्या रुग्णांनी या 5 गोष्टींची काळजी घ्यावी