दिवाळीच्या सणात संपत्ती आणि सौख्याची देवी आणि गणपती महाराजांची पूजा केली जाते. शास्त्रानुसार, धन-ऐश्वर्य, सौख्य आणि सौभाग्य प्राप्तीसाठी दिवाळीची रात्र लक्ष्मी-गणेशाच्या पूजेसाठी सर्वोत्तम शुभ काळ मानले आहे. पण आई लक्ष्मीच्या पूजेसाठी वास्तूचे नियम लक्षात ठेवणं देखील फार महत्त्वाचे आहे. यामुळे पूजेत लक्ष लागतं आणि पूजेची फळ प्राप्ती लगेच होते. वास्तूचे हे नियम या प्रकारे आहेत.
* या दिशेने पूजा करावी -
सर्वप्रथम देवघर स्वच्छ असावे. भिंती फिकट पिवळ्या, गुलाबी किंवा हिरव्या रंगाच्या असणे जास्त योग्य आहे कारण हे रंग
सकारात्मक ऊर्जेची पातळी वाढवतात. काळे, निळे आणि तपकिरी सारख्या तामसिक रंगांचा वापर देवघराच्या भिंतींवर करू नये. वास्तू विज्ञानानुसार मानसिक स्पष्टता आणि ज्ञानाची दिशा उत्तर -पूर्व पूजेसाठी आदर्श स्थळ आहे. कारण हा कोण पूर्व आणि उत्तर दिशेच्या शुभ प्रभावाशी संबंधित आहे. घराच्या या भागात सात्त्विक ऊर्जेचा परिणाम 100 टक्के होतो.
* उत्तर पूर्व दिशेकडे पूजेचे साहित्य ठेवा -
पूजा करताना तोंड उत्तरेकडे किंवा पूर्व दिशेकडे असावे. उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे म्हणून हे स्थळ यक्ष साधना (कुबेर), लक्ष्मी-पूजन आणि गणेश पूजनासाठी आदर्श स्थळ आहे. लक्षात ठेवा, दिवाळीच्या पूजेसाठी असणाऱ्या मातीच्या लक्ष्मी-गणपतीची मूर्ती किंवा चित्र नवीन असावे. चांदीच्या मूर्तींना स्वच्छ करून उजळवून परत पूजेसाठी वापरण्यात घेता येतं. पूजेचे घट आणि इतर पूजेचे साहित्य जसे साळीच्या लाह्या, बत्तासे, शेंदूर, गंगाजल, अक्षता, रोली, मोली, फळे, मिठाई, पान-सुपारी, वेलची इत्यादी उत्तर-पूर्वी कडेच ठेवणं शुभ ठरतं.
* लाल रंग हे धनाची देवी लक्ष्मीला आवडतं -
देवी लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय आहे. लाल रंग हे वास्तू मध्ये देखील सामर्थ्य आणि पराक्रमाचे प्रतीक मानले आहेत, म्हणून देवी आईला अर्पण केले जाणारे कपडे, शृंगाराच्या वस्तू आणि फुले शक्यतो लाल रंगाचे असावे. देवघराच्या दारावर शेंदूर किंवा कुंकुाने स्वस्तिक बनविल्याने नकारात्मक शक्ती घरात येत नाही.
* शंखाच्या आवाजाने देवता प्रसन्न होतात -
वास्तुशास्त्रानुसार, शंखाचा आणि घंटाळीचा आवाज केल्याने देवी आणि देव प्रसन्न होतात आणि सभोवतालीचे वातावरण शुद्ध आणि पावित्र्य होऊन मनात आणि मेंदूत सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. दिवाळीच्या पूजनात श्रीयंत्र, कवडी आणि गोमती चक्राची पूजा केल्याने सौख्य -समृद्धी आणि भरभराट याना आमंत्रण देते.