Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

सुगंधी उटण्याचे काय फायदे आहे जाणून घ्या?

सुगंधी उटण्याचे काय फायदे आहे जाणून घ्या?
, सोमवार, 24 ऑक्टोबर 2022 (07:45 IST)
सणासुदी जवळ येतातच कामाचा व्याप वाढून जातो. धावपळ, दगदग, घराची स्वच्छतेपासून सजावटी आणि खाण्या -पिण्याच्या बाबतीत स्वतःसाठी वेळच मिळत नाही. अश्या मध्ये जेव्हा कुटुंबियांसह आणि मित्रांसह वेळ घालवताना फोटो काढण्याच्या वेळी आपल्या चेहऱ्यावरील तेज नाहीसा होतो. पण घरात बसून देखील चेहऱ्याचा तजेल पणा सहजपणे मिळवू शकतो. या साठी काही घरगुती उटणे  तयार करण्याची गरज असणार. उटणे हा एक नैसर्गिक फेसमास्क आहे. उटण्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. फक्त दिवाळीतच नव्हे तर हे नियमित उटणे लावल्यास तुमची त्वचा अधिक मुलायम आणि ताजीतवाणी राहते. उटण्यामध्ये सहसा बेसनाचे पीठ, चंदन पावडर, दुध किंवा गुलाबजल वापरतात. चला तर मग जाणून घेऊया की या उण्यामुळे  आपली त्वचा कशी चकाकेल. 
 
पार्लरच्या महागड्या फॅशियल आणि क्लीनअपने मिळणारा तजेलपणा देखील या घरगुती उटण्यामुळे मिळवू शकता. या साठी आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागणार.
 
1 चमचा नारळाच्या दुधासह 1/4 चमचा हळद आणि थोडे  चंदन पावडर मिसळा. या पॅकने आपल्या त्वचेची मालीश करा. आणि याला 15 मिनिटे तसेच राहू द्या. कोमट पाण्याने याला धुऊन घ्या. त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी हळद ही सर्वोत्तम मानली जाते. चमकती त्वचा मिळविण्यासाठी, टॅन काढण्यासाठी आणि मुरुमांशी लढण्यासाठी या पॅकचा वापर करावा. हे अँटी ऑक्सिडंटने भरपूर असतं. जे छिद्र स्वच्छ करून नैसर्गिक चमक देतं.
 
दूध किंवा पाण्यात बदाम रात्रभर भिजत ठेवा. सकाळी याची मऊ अशी पेस्ट बनवा. या पेस्टला आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर समान रीतीने लावा आणि 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या. व्हिटॅमिन इ आणि लॅक्टिक ऍसिडमध्ये भिजत टाकल्यानं आपल्या त्वचेच्या जटिलतेत सुधारणा होईल आणि त्वचा मऊ होईल त्याच सह चकाकी येते. त्वरितच चमक मिळविण्यासाठी हे एक सोपे पॅक आहे.
 
सर्वप्रथम उडदाची डाळ वाटून त्याची भुकटी बनवा. आता या मध्ये चिमूटभर हळद आणि गरजेपुरतं पाणी घाला. तयार झालेल्या पेस्टला चेहऱ्यावर लावून काही काळ वाळू द्या आणि नंतर स्क्रब करत चेहऱ्याला हळुवार हाताने मालीश करा.
 
बेसन, हळद, गुलाबाचे पाणी व दुधावरची साय यांच्या लेपाने धुळ व माती तसेच चेहर्‍यावरील मृत त्वचा काढून टाका.
 
नंतर कोणत्याही कोल्डक्रिमने चेहर्‍यावर तसेच मानेवर मॉलिश करून 5 मिनिटे वाफ घ्या. 
 
2 चमचे मुलतानी माती, 1 चमचा मध, 2 चमचे गुलाबाचे पाणी, 1 चमचा चंदन पावडर यांचे दह्यात मिळवून लेप बनवून घ्या. हा लेप चेहरा, गळा व मानेला लावून घ्या. सुकल्यावर चेहरा धुऊन घ्या. चेहरा उठून दिसेल. 
 
यानंतर हाथ व पायांची काळजी घ्या. कोमट पाण्यात एक चमचा शॅम्पू, 3 ते 4 थेंब लिंबू व चिमूटभर मीठ टाकून या पाण्यात हात व पाय 10-15 मिनिटे बुडवून ठेवा. नंतर ब्रशच्या साह्याने मृत त्वचा काढून टाका. हाथ व पाय साध्या पाण्याने धुऊन मॉयश्चराइजर लावा. तुमचे हात व पाय सुंदर व कोमल दिसू लागतील.  

Edited by : Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Narak Chaturdashi 2022 Wishes नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा