दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी आम आदमी पार्टीने (आप) सर्व ७० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यांपैकी नवी दिल्ली मतदारसंघातून स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तर पटपडगंज येथून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे निवडणूक लढवणार आहेत.
उमेदवारांच्या नावांची यादी अंतिम करण्यासाठी आपकडूनपॉलिटिकल अफेअर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अंतिम यादीवर शिक्कामोर्तब झाला.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना मनिष सिसोदिया म्हणाले, बैठकीत ४६ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर ९ जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच १५ जागांवर विद्यामान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यंदा ६ महिलांना ऐवजी ८ महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तसेच ६ रिक्त जागांवरही नव्या लोकांना संधी देण्यात आली आहे.