Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शहांना दिल्लीत प्रचारबंदी करा

Webdunia
गुरूवार, 30 जानेवारी 2020 (11:25 IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचारावेळी दिल्लीचे मख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल  यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना 48 तासांसाठी प्रचारबंदी करण्यात यावी, अशी मागणी आम आदीमी पार्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
 
निवडणूक आयोगाकडे आम आदमी पक्षाची मागणी आपचे नेते संजय सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली आहे. अमित शहा हे त्यांच्या खासदारांनासोबत घेऊन दिल्लीच्या शाळेतील विाद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे बनावट व्हिडिओ करून अपमान करत आहेत. त्यामुळेच शहा यांना 24 तासांसाठी निवडणूक प्रचारबंदी करण्यात यावी, अशी मागणी आपने केली आहे.
 
यावेळी त्यांनी भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांच्या वक्तव्याचाही सामाचार घेतला. वर्मा यांचे ते आक्षेपहार्य वक्तव्य शिक्षणावर काम करणार्‍या केजरीवाल यांच्याविरोधातील आहे. शिक्षण क्षेत्रासाठी भरीव काम  करणार्‍या केजरीवालांना भाजपचे खासदार वर्मा हे दहशतवादी संबोधत आहेत. लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारा, शहिदांच्या कुटुंबीयांना एक कोटीचं अर्थसहाय्य देणार्‍या व्यक्तिविरोधात असे वक्तव्य करणे योग्य नाही. भाजप केजरीवाल यांना जेवढ्या शिव्या घालतील, तेवढ्याच जोशाने दिल्लीची जनता आपला भरघोस मतदान करून भाजपला प्रत्युत्तर देतील, असे सिंह यांनी सांगितले.
 
दरम्यान, निवडणूक प्रचारात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने भाजप खासदार प्रवेश वर्मा आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर कारवाई केली असून दोघांनाही प्रचारबंदी करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये जे काश्मिरी पंडितांसोबत झाले होते. तेच दिल्ली मध्येदेखील होऊ शकते. शाहीन बागेत सीएएविरोधी निदर्शकांच्या घरात घुसून महिलांवर दुष्मर्क करू शकतो, अशी धमकीही भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी दिली होती. तर सोमवारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रचार सभेत 'गद्दारांना गोळ्या झाडा' या आशाची घोषणाबाजी केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

अंधेरी लोखंडवाला कॉंम्प्लेक्स मध्ये भीषण आग

'एक देश, एक निवडणूक'वर राज ठाकरेंचा टोला, म्हणाले- महाराष्ट्रात पहिली महापालिका निवडणूक झाली पाहिजे

मद्यप्रेमींना दिलासा, या राज्यात नवीन अबकारी धोरणामुळे किमती कमी होणार

भीषण रस्ता अपघात, 5 जण गंभीर जखमी

पुण्यामध्ये सरकारी शिक्षकाने केली पत्नीच्या बॉयफ्रेंडची हत्या

पुढील लेख
Show comments