साहित्य-
18 मारी गोल्ड बिस्किट
3 मोठे चमचे चॉकलेट सॉस
1 मोठा चमचा कोको पाउडर
2 ½ मोठा चमचा साखर
5 से 6 मोठे चमचे बटर
व्हॅनिला एसेंस
कृती-
चॉकलेटचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी बिस्किट बारीक करून त्याची पूड बनवून घ्यावी. मग त्यामध्ये बटर, कोको पावडर, चॉकलेट सॉस आणि साखर घालावी. तसेच यामध्ये व्हॅनिला एसेंस घालून हे चांगल्या प्रकारे मिक्स करावे. यानंतर यामध्ये बिस्किट पावडर घालावी. मऊ असा गोळा तयार करून घ्यावा. यानंतर एका चॉकलेट ट्रे ला बटर लावून ग्रीस करून घ्यावे. आता तयार गोळ्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करावे. तसेच आता या बॉल्सला फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवावे. तर चला तयार आहे आपले चॉकलेट बॉल्स दिवाळीच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांना नक्कीच द्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik