साहित्य - मैदा, मैदा भिजविण्यासाठी दूध, तळण्यासाठी साजूक तूप
आतले सारणाचे साहित्य - खोबर्याचा किस, दळलेली साखर, मावा, काजू, किसमिस, बदाम, खसखस, चारोळ्या, इलायची पावडर, जायफळ पूड.
कृती - मैदा बारीक चाळणीने चाळून घ्या. त्यात मोहन घालून दुधात मळून घ्या. आतील सारणासाठी खोबर्याच्या किसात आवडीप्रमाणे दळलेली साखर घाला. एका कढईत मावा घेऊन मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. हा मावा थंड झाल्यावर वरील सारणात मिळवा. यात काजू बदामाचे तुकडे करून टाका. खसखस, चारोळ्या, इलायची पूड, जायफळ पूड टाकून सर्व मिश्रण एकजीव करा. भिजविलेल्या मैद्याचे छोटे गोळे तयार करा. प्रत्येक गोळ्याला गोल आकारात लाटून घ्या. त्यात वरील सारण भरून करंजीचा आकार द्या. एका कढईत तूप गरम करून करंज्या मंद आचेवर खरपूस तळून घ्या.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा