खुसखुशीत खमंग चकली बनवण्यासाठी सर्वात आधी तांदुळ, मूग डाळ, चणा डाळ, पोहे, ज्वारी हे एकत्र करून भाजून घ्यावे. नंतर त्यामध्ये धणे व जिरे घालून हे सर्व मिश्रण दळून घ्यावे. आता दळलेल्या या मिश्रणाचे पीठ एका ताटात घेउन त्यामध्ये मीठ, तिखट, तीळ, थोडेसे तेल व गरजेपुरते कोमट पाणी घालावे व हे चांगल्याप्रकारे घट्ट मळून घ्यावे. तसेच चकली यंत्राच्या मदतीने चकली तयार करावी व तेलात खमंग होइसपर्यंत तळावी. तर चला तयार आहे आपली दिवाळी विशेष खुसखुशीत खमंग चकली, गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.