Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवाळीच्या फराळात हेल्दी पर्याय हवेत? भाजलेले मखाणे, खजूर बाइट्स आणि ड्रायफ्रूट स्नॅक्स

Diwalifaral
दिवाळीच्या फराळात कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण कमी करून आरोग्यदायी पर्याय शोधत असाल, तर भाजलेले मखाणे, खजूर बाइट्स आणि ड्रायफ्रूट स्नॅक्स हे अतिशय पौष्टिक व चवदार पर्याय आहे. हे पर्याय कसे तयार करावेत याची सोपी माहिती लिहून घ्या....
 
१. मसालेदार व खमंग भाजलेले मखाणे
साहित्य: २-३ वाट्या मखाणे, १ चमचा साजूक तूप, हळद, चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड, चाट मसाला आणि कढीपत्ता.
 
कृती:कढईत १ चमचा तूप गरम करा. त्यात कढीपत्ता, हळद, मीठ, काळी मिरी पूड आणि चाट मसाला घाला. आता मखाणे घालून मंद आचेवर ८ ते १० मिनिटे सतत ढवळत खमंग व कुरकुरीत होईपर्यंत भाजा. पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरा. हा फराळ पचनास हलका आणि प्रोटिनने भरपूर असतो.
 
२. शुगर-फ्री खजूर व ड्रायफ्रूट बाइट्स
साहित्य: १ वाटी बिया काढलेला मऊ खजूर (पेस्ट किंवा बारीक तुकडे), १/२ वाटी मिक्स ड्रायफ्रूट्स (काजू, बदाम, पिस्ताचे तुकडे), १ चमचा तूप, १ चमचा खसखस.
 
कृती: कढईत तूप गरम करून सुकामेवा (ड्रायफ्रूट्स) २ मिनिटे मंद आचेवर परतून बाजूला ठेवा. त्याच कढईत खजूर घालून २-३ मिनिटे परता, ज्यामुळे तो मऊ आणि एकजीव होईल. त्यात भाजलेला सुकामेवा व थोडी वेलची पूड घाला. सर्व मिश्रण एकत्र करून त्याचे लांब रोल किंवा चौकोनी वड्या (Bites) पाडा. वरून थोडी भाजलेली खसखस लावा. यामध्ये साखरेचा अजिबात वापर होत नाही.
 
३. रोस्टेड ड्रायफ्रूट व सीड्स नमकीन
साहित्य: बदाम, काजू, मगज बी (पंपकिन/सनफ्लॉवर सीड्स), किसलेले सुके खोबरे, १ चमचा तूप, सेंधवा मीठ आणि काळी मिरी पूड.
 
कृती: कढईत अगदी थोडे तूप घालून बदाम आणि काजू मंद आचेवर खमंग तळून/भाजून घ्या. त्यात बीया आणि खोबऱ्याचे काप घालून २ मिनिटे परता. शेवटी सेंधवा मीठ  आणि काळी मिरी पूड घालून एकत्र करा.
हेल्दी फराळाचे फायदे:
कमी कॅलरीज: न तळलेले असल्यामुळे वजन वाढण्याची भीती नसते.
नैसर्गिक गोडवा: खजुरामुळे शरीराला तातडीने ऊर्जा मिळते.
डायबिटीज व फिटनेस फ्रीक्ससाठी उत्तम: ज्यांना साखरेचा त्रास आहे किंवा जे डाएटवर आहेत, त्यांच्यासाठी हे उत्तम पर्याय आहेत.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिवाळीसाठी गॅससमोर तासन्‌तास उभे राहायचे नाही? कमी वेळात तयार होणारे ७ चविष्ट पदार्थ