सारणसाठी साहित्य : १ कप बारीक रवा, १ कप मैदा, मुटका वळेपर्यंत तुपाचं मोहन, निरस दूध व पाणी घालून भिजत ठेवा. पीठ भिजवून अर्धा तास ठेवा. चटणी ग्राईंडरमध्ये थोडं थोडं पीठ घालून मऊ करुन घ्या.
सारणासाठी : एक मोठे नारळ, १ कप साईसकट दूध, दीड ते दोन कप साखर. सर्व एकत्र शिजवून घ्या. घट्ट झाल्यावर वाटल्यास मिक्सरमधून काढा, म्हणजे सारण एकसारखं मोकळं होईल. वेलीदोडे, जायफळपूड, चारोळी इत्यादी घाला. पुर्या लाटून घ्या. सारण भरून कड दुधाने चिकटवा. मंद गॅसवर तळा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा