साहित्य-
8 वाटया डाळीचे पीठ
2 वाटी तेल
आवश्यकतेनुसार तिखट
चवीनुसार मीठ
अर्धा चमचा हळद
2 चमचा ओवापूड
तळण्याकरता तेल
कृती-
दिवाळी फराळ मध्ये शेव बनवण्यासाठी सर्वात आधी एका परातीत तेल, पाणी घालून हाताने मिक्स करावे. मग त्या तेलात ओवापूड, मीठ, तिखट, हळद घालावी व डाळीचे पीठ घालावे. खूप घट्ट पण भिजवायचे नाही. आता कढईत तेल गरम करण्यास ठेवावे. तसेच तयार पीठ सोर्यात भरावे. सोर्याला कढईतल्या तेलावर धरून हाताने गोल फिरवत सोर्या दाबून कढईत शेवेचा गोल चवंगा पाडावा. आता थोडया वेळाने दूसर्या बाजूनी तळावे. अश्या प्रकारे शेव तळून घ्यावी. तर चला तयार आहे आपली दिवाळी फराळ विशेष खमंग शेव.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik