Festival Posters

दिवाळी फराळ करिता बनवा पोह्यांचा चिवडा

Webdunia
रविवार, 27 ऑक्टोबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
250 ग्रॅम भाजके पोहे  
250 ग्रॅम शेंगदाणे 
100 ग्रॅम खोबऱ्याचे पातळ काप  
100 ग्रॅम डाळ 
10 ते 12 मिरच्या 
250 ग्रॅम तेल
चवीनुसार मीठ 
लाल तिखट
हळद 
धणे पूड
1 चमचा पिठीसाखर
कढीपत्ता 
 
कृती-
पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी सर्वात आधी पोहे स्वच्छ चाळणीने चाळून घ्यावे.आता एका मोठ्या कढईमध्ये भाजून घ्यावे. आता मोठ्या पातेल्यात तेल घालून त्यात कढीपत्त्याची पाने, मिरच्या घालून परतवून घ्यावे. आता त्यामध्ये हळद, तिखट, धणेपूड व दाणे घालून घ्यावे. तसेच दाणे खमंग परतले कि खोबर्‍याचे काप व डाळ घालून परतावे. आता तयार झालेल्या या फोडणीमध्ये भाजलेले पोहे घालावे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ व पिठी साखर घालून चिवडा परतवून घ्यावा. तर चला तयार आहे आपला दिवाळी विशेष पोह्यांचा चिवडा, थंड झाल्यानंतर डब्ब्यात भरावा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

चंपाषष्ठी विशेष रेसिपी : खंडेरायाचा नैवेद्य रोडगे कसे बनवायचे

लग्नसराई विशेष वधू/वरास केळवण करताय; मग घरीच बनवा झटपट ड्राय गुलाबजाम पाककृती

नाश्ता काय करायचा? किमान महिनाभर रिपीट होणार नाही अश्या पौष्टिक आणि सोप्या ब्रेकफास्टची यादी बघा

हिवाळ्यात खाण्यास चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर अशी झटपट मुळा चटणी बनवा

सकाळी बीटरूट ज्यूस प्यायल्याने फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments