Marathi Biodata Maker

पाकातले चिरोटे (व्हिडिओ पहा)

Webdunia
साहित्य: 3 वाटी रवा, 1 वाटी मैदा, तेल, 1 वाटी दही, 4 वाटी साखर, 1 वाटी तांदूळाचं पीठ, साजूक तूप, वेलची पूड, ‍चिमूटभर सोडा, आवडत असल्यास खाण्याचा रंग, दूध.


 
कृती: पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात 2 वाटी पाणी आणि 2 वाटी साखर घालून ते चांगले उकळवा. एकतारी पाक तयार झाला की त्यात वेलची पूड आणि खाण्याचा रंग मिसळून गॅस बंद करा. त्यानंतर प्रथम रवा, मैदा, ‍चिमूटभर सोडा आणि तेलाचे मोहन घालून मिश्रण चांगले एकजीव करा. दूधाने ते मिश्रण पोळीच्या पिठासारखे मळून घ्यावे. वेगळ्या भांड्यात तांदूळाचं पीठ आणि तूप मिसळून मिश्रण तयार करा.


पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करुन त्याची पोळी लाटून घ्या, नंतर त्या लाटलेल्या पोळीवर तांदूळाचं पीठ आणि तूपाचे मिश्रण लावून त्यावर दुसरी पोळी ठेवा. मग त्याचा रोल तयार करा. तयार केलेल्या रोलचे समान आकारात चाकूने तुकडे करून घ्या त्या तुकड्यांना पुन्हा थोडेसे लांबट आकारात हलक्या हाताने चिरोटे लाटा. हे चिरोटे तूपात छान खरपूस तळून घ्या, ते तळलेले चिरोटे आता तयार पाकात सोडा 1 ते 2 तास भिजू द्या. नंतर बाहर काढून घ्या.
 
सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

कच्च्या केळ्याचे कटलेट; या वटपौर्णिमेला नक्की ट्राय करा हा पौष्टिक फराळी बेत

किडनीच्या रुग्णांनी काय खावे आणि काय खाऊ नये जाणून घ्या

CareerTips : 10वी 12वी नंतर वेब डिझायनिंग मध्ये सर्टिफिकेट कोर्स करून करिअर बनवा

मशरूम केसांना काळे करण्यासाठी फायदेशीर आहे, इतर फायदे जाणून घ्या

जेवणानंतर लगेच चहा पिणे ही एक गंभीर समस्या असू शकते; तोटे जाणून घ्या…

पुढील लेख
Show comments