Dharma Sangrah

अमृततुल्य चहा Weight Loss करण्यासाठी डायटमध्ये सामील करा

Webdunia
Amrutulya Chaha बदलती जीवनशैली आणि अस्वास्थ्यकर आहार यांमुळे आजकाल लठ्ठपणाची समस्या सामान्य होत आहे. वाढत्या वजनामुळे लोक अनेक गंभीर आजारांना सामोरे जातात. त्यामुळे वेळीच वजन नियंत्रित करणे आवश्यक आहे.
 
वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारे गुळाचा वापर करा
ज्यांना वाढत्या वजनाची चिंता आहे त्यांच्यासाठी गुळाचा चहा अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. तांबे, पोटॅशियम, कॅल्शियम, जस्त यांसारखे पोषक घटक गुळात आढळतात. जे शरीरासाठी आवश्यक घटक आहेत. तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात गुळाचा चहा समाविष्ट करू शकता, ते वजन कमी करण्यास मदत करू शकते.
 
गुळाचा चहा कसा बनवायचा
साहित्य- 
1 टीस्पून गूळ
, 2 कप पाणी, 
1 टीस्पून बडीशेप, 
दालचिनीची काडीँ 
1 टीस्पून अजवाईन, 1 वेलची, 
3-4 तुळशीची पाने.
 
कृती- 
एका पातेल्यात पाणी घाला. उकळायला लागल्यावर त्यात गूळ, वेलची, ओवा आणि तुळशीची पाने टाका. आता हे मिश्रण चांगले उकळून घ्या. नंतर गाळून घ्या, दुपारच्या जेवणानंतर हा चहा प्या किंवा संध्याकाळी गुळाचा चहा देखील पिऊ शकता. या चहामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते.
 
दुधाचा चहा करायचा असल्यास - 
साहित्य-
लवंग, वेलची, काळे मिरे, दालचीनी, आलं, गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या, तुळशीचे पानं, गुळ, सूंठ, तुळस, दूध, चहापत्ती, पाणी.
 
कृती- 
गुळाचा चहा तयार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. पाणी गरम झाल्यावर त्यात तुळशीचे पानं घाला. आता लवंग, वेलची, काळेमिरे, दालचीनी, आलं, सूंठ आणि गुलाबाच्या पाकळ्या कुटून घ्या. पाणी उकळल्यावर कुटलेला मसाला त्यात घालून द्या. नंतर यात चहापत्ती घालून उकळून घ्या आणि मग गुळ घाला. छान शिजल्यावर यात दूध मिसळून किमान सात ते दहा मिनिट शिजू द्या. गुळाचा चहा तयार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेते किवी फेसपॅक, कसे बनवाल

हिवाळ्यासाठी खास: कमी कॅलरीजचे देसी सूप! वजन कमी करण्यासाठी आणि थंडीत ऊब देण्यासाठी बनवा 'ही' खास डाळ सूप रेसिपी

सदाफुलीची पाने चावून खाल्ल्याने हे 7 फायदे मिळतील, जाणून घ्या

डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंग मध्ये करिअर बनवा

वारानुसार दररोज फेस पॅक लावा आणि जादुई चमक मिळवा

पुढील लेख
Show comments