आश्विन शुक्ल दशमीला साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणाला दसरा आणि विजयादशमी असे म्हणतात. या दिवशी रावण आणि महिषासुराच्या वधाच्या व्यतिरिक्त बरेच काही घडले होते. जाणून घेऊ या 10 घटनांबद्दल.
उल्लेखनीय आहे की जेव्हा दशमी आणि नवमी एकत्र असते तेव्हा कल्याण आणि विजयासाठी अपराजिता देवीची पूजा दशमी तिथीला उत्तर-पूर्वेच्या दिशेत अपराह्ण म्हणजे दुपारी केली जाते.
आश्विनस्य सिते पक्षे दशम्यां तारकोदये
स कालो विजयो ज्ञेयः सर्वकार्यार्थसिद्ध
म्हणजे आश्विन महिन्याच्या शुक्लपक्षाची दशमी तिथीला ताऱ्यांच्या उदयकाळात मृत्यू वर देखील विजय मिळविण्याचा काळ मानतात. आपल्या सनातन संस्कृतीत दसरा हा विजयाचा आणि शुभता दर्शविणारा सण आहे. वाईटावर चांगल्याची आणि असत्यावर सत्याची विजय मिळविण्याचा हा सण, म्हणून ह्याला विजयादशमी म्हणतात.
1 याच दिवशी असुर महिषासुराचा वध करून आई कात्यायनी विजयी झाली.
2 या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून त्याला मुक्ती दिली.
3 असे म्हणतात की याच दिवशी देवी सती आपल्या वडिलांच्या दक्षाच्या यज्ञ वेदीत सामावली असे.
4 असे म्हणतात की याच दिवशी पांडवांना वनवास मिळाले.
5 असे म्हणतात की याच दिवशी पांडवांनी कौरवांवर विजय मिळवली. पण याचे काहीही पुरावे नाही. महाभारताचा युद्ध 22 नोव्हेंबर 3067 रोजी झाले. हे युद्ध तब्बल 18 दिवसापर्यंत चालले होते. खरं तर याच दिवशी अज्ञातवास समाप्ती नंतर पांडवांनी शक्तिपूजन करून शमीच्या झाडात लपविले, आपले शस्त्र पुन्हा आपल्या हातात घेतले आणि विराटच्या गायी चोरणारी कौरव सैन्यावर हल्ला करून विजय मिळवली.
6 या दिवशी वर्षाऋतूच्या समाप्तीवर चातुर्मास देखील संपतो.
7 याच दिवशी शिर्डीच्या साईबाबांनी समाधी घेतली.
8 अशी आख्यायिका आहे की दसऱ्याच्या दिवशी कुबेर यांनी राजा रघूला स्वर्ण मुद्रा देत शमीच्या पानांना सोन्याचे बनविले असे, त्या दिवसा पासून शमी हे सोनं देण्याचं झाड म्हणून मानलं जातं. एका कथेनुसार अयोध्याचे राजा रघु यांनी विश्वजित यज्ञ केले. सारं काही दान करून ते एका पर्णकुटीत राहू लागले. तिथे एक कौत्स नावाचा ब्राह्मणाचा मुलगा आला. त्याने राजा रघुला सांगितले की त्याला आपल्या गुरूला गुरुदक्षिणा देण्यासाठी 14 कोटी सोन्याच्या नाण्यांची गरज आहे. त्यावर राजा रघु कुबेरावर हल्ला करण्यासाठी तयार झाले. घाबरून कुबेर राजा रघूंना शरणागत झाले. आणि त्यांनी अश्मन्तक आणि शमीच्या झाडावर स्वर्णमुद्रांचा वर्षाव केला. त्यामधून कौत्साने फक्त 14 कोटी स्वर्णमुद्रां घेतल्या. ज्या स्वर्णमुद्रां कौत्साने घेतल्या नाहीत, त्यांना राजा रघुने वाटप केल्या. तेव्हा पासून दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोन्याच्या रूपात अश्मन्तकाची पाने देतात.
9 असे ही म्हटले जाते की एकदा एका राजाने देवाचे देऊळ बनवले आणि त्यामध्ये देवाची प्राण-प्रतिष्ठा करण्यासाठी एका ब्राह्मणाला बोलावलं. ब्राह्मणाने दक्षिणेत 1 लाख सोन्याची नाणी मागितली तर राजा विचारात पडला. मागितलेली दक्षिणा न देता त्याला पाठवणे देखील योग्य नव्हते तर त्यांनी ब्राह्मणाला एक रात्री आपल्या महालात थांबण्यासाठी सांगितले आणि सकाळ पर्यंत व्यवस्था करतो असे सांगितले. रात्री राजा काळजीपोटी झोपी गेला. स्वप्नात देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले की तू शमीची पाने घेऊन ये मी त्याला सोन्याची करून देतो. हे स्वप्न बघतातच त्याला एकाएकी जाग येते त्यांनी उठून आपल्या सेवकांना घेऊन शमीची पाने घेण्यासाठी गेला, सकाळ पर्यंत त्यांनी खूप पाने एकत्र केले. लगेचच चमत्कार घडला आणि सर्व शमीची पाने सोन्याची झाली. तेव्हा पासून या दिवशी शमीची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली.
10 तसे हा सण प्राचीन काळापासून सुरूच आहे. सुरवातीच्या काळात हा सण एक कृषिप्रधान लोकांचा उत्सव होता. पावसाळ्यात पेरणी केलेल्या पहिल्या पिकाला शेतकरी घरी आणल्यावर हा सण साजरा केला जात होता.
पौराणिक ग्रंथांमध्ये असे ही म्हटले आहेत की राजा भगीरथांनी आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळवून देण्यासाठी भगवान शंकराची पूजा करून गंगेला या स्वर्गातून पृथ्वीवर आणले होते. ज्या दिवशी त्यांनी गंगेला पृथ्वी वर आणले तो दिवस गंगा दसऱ्याच्या नावाने ओळखतात. ज्येष्ठ शुक्लच्या दशमी ला हस्त नक्षत्रात स्वर्गातून गंगा अवतरली.