Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

3 शाळकरी मित्रांचा ओढ्यात बुडून मृत्यू

3 school friends drown in river 3 शाळकरी मित्रांचा ओढ्यात बुडून मृत्यू  Maharashtra Regional News In Webdunia Marathi
, शुक्रवार, 25 मार्च 2022 (12:27 IST)
शाळा सुटल्यावर मुले घरी आली नाहीत, चौकशी साठी पालकांनी त्यांची शोधाशोध केलं असता त्यांची दप्तरे ओढ्याजवळ आढळून आल्याचे कळले. ओढ्यात बुडून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या  3 शाळकरी मुलांचा दुर्देवी  मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील आष्टी जवळ संकनपुरी येथे घडली आहे. अजय रघुनाथ टेकाळे (13), करण बाळासाहेब नाचण (10) आणी उमेश बाबासाहेब नाचण असे या शाळकरी मुलांची नावे आहेत. हे तिघे शाळा सुटल्यावर सकाळी 10:30 वाजता ओढ्यात पोहोण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचे दप्तर ओढ्याच्या बाहेर असल्यामुळे गावकरीना त्यांचा शोध लागला. मुलं पाण्यात बुडालेली पाहून काहींनी पाण्यात उद्या टाकल्या आणि तिघाचें मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. आपल्या लेकरांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली  आहे. 
 
  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातील सर्व शाळा संपूर्ण क्षमतेसह सुरू करण्यास राज्य सरकारची परवानगी