आजचा युग हा विज्ञानाचा युग आहे. माणसाच्या सर्व हालचाली सर्व काम विज्ञानामुळेच संभव आणि सोपे झाले आहेत. विज्ञानामुळे आकाशापासून तर पाताळा पर्यंत मोजणे शक्य झाले आहेत. माणसाने विज्ञानामुळे बरीच प्रगती केली आहे. नाही तर या पूर्वी तो अगदी रानटी जीवन जगत होता. गुहेत राहायचा, कच्च मांस खायचा, झाडांची पाने कपड्या ऐवजी घालायचा. हळू-हळू करून त्याने प्रगती केली तो सर्व काही शिकू लागला. त्याने आगेचा शोध लावला, चाकाचा शोध लावला. हळू-हळू करून तो आधुनिक युगात शिरकावं करत गेला. विज्ञानाच्या आविष्कारांना आपण सर्वी कडे बघतो आणि अनुभवतो आणि उपयोगात आणतो.
विज्ञानामुळे आपले जीवन जगणे आनंदी आणि सोपे झाले आहेत. विज्ञानाशिवाय राहण्याची माणूस कल्पना देखील करू शकत नाही. शेतीसाठी लागणारी साधने जसे की ट्रॅक्टर, हॅकर कम्पाइन सारखे साधने बनविले आहेत. घरात प्रेस, गॅस चिमणी, फ्रिज, मिक्सर सारखे साधने बनविले आहेत. ज्यांना वापरून जगणं सोपं झाले आहेत.
पूर्वी लोक आजारपणाने मरत होते जसे मलेरिया, डेंग्यू, प्लेग, कॉलरा..आज विज्ञानाने या सर्व आजारांवर नियंत्रण मिळवले आहे. आपल्या शत्रू पक्षाचा नायनाट आणि त्यांच्या पासून आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. सुई पासून मोठे-मोठे जहाज, ट्रेन, विमान आणि कृत्रिम गृह देखील बनवले जाते.
विज्ञान आज प्रत्येक क्षेत्रात वापरले जाते. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये विज्ञानाचे उपयोग होतं नाही. टीव्ही, टेलिफोन, फॅक्स, ईमेल, मोबाइलफोन यांचा वापर करून आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेची माहिती घेऊ शकतो आणि फोनने कोणाशी ही संवाद साधू शकतो मग तो जगाच्या कुठल्याही जागी असो.
विज्ञानाच्या साहाय्याने आज मनुष्य ट्रेन, मोटार, पाण्याचे जहाज, वायुयान या साधनाने आपली यात्रा पूर्ण करू शकतात आणि ते देखील कमी वेळात. या पूर्वी माणसाला लांबची यात्रा करणे अवघड असायचे पण आता हे फार सोपे झाले आहे. या साधनांमुळे व्यवसायाच्या क्षेत्रात देखील उन्नती झाली आहे. औषधी क्षेत्र मध्ये देखील विज्ञानाने फार प्रगती केली आहे. आज गंभीर रोगांपासून माणूस वाचून जातो. विज्ञानाने गंभीर आजारांवर देखील प्रभुत्व मिळवले आहेत.
विज्ञान मुळे एक्सरे, अल्ट्रासाउंड, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी सिटी स्कॅन सारख्या मशिनींमुळे शरीरातील आजारांविषयी कळू शकणे शक्य झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार करणे देखील शक्य झाले आहेत.
कारखान्यामध्ये मोठ्या मोठ्या मशिनी लागल्या आहेत ज्यामुळे श्रम आणि वेळेची बचत होते आणि उद्योग देखील वाढते. शिक्षणाच्या क्षेत्रात देखील विज्ञानाचा मोठा वाटा आहे. इंटरनेट, कम्प्युटरने आजचं जीवन जगणं खूपच सोपे केले आहेत. या मुळे पुस्तके देखील छापले जातात. मोठे-मोठे प्रकल्प देखील पूर्ण केले जाते.
आपले सर्व सुख आणि सोयी विज्ञानामुळेच आहे. दर रोज नवे-नवे आविष्कार होतं आहे. आजचा काळं बटणांवर आहे बटण दाबले की सगळी कामे चटकन पूर्ण होतात.
विज्ञान आपल्याला एक वरदानच आहे पण असे म्हणतात की जेवढे विज्ञानाने आपल्याला फायदे दिले आहे तेवढेच तोटे देखील आहेत. विज्ञानामुळे माणूस आळशी झाला आहे. त्याच्या आविष्काराच्या साधनांचा इतका आहारी गेला आहे की त्याला त्याशिवाय जगणे अशक्य झाले आहे. मोठे मोठे बॉम्ब, मिसाइल आणि विषारी गॅसच्या प्रादुर्भावामुळे माणूस तसेच प्राणांच्या जीवनासाठी हानिकारक आहे. उद्योग क्षेत्रातील कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे तसेच गाड्यांतून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषण होतं आणि त्यामुळे आजार वाढत आहे.
विज्ञान जसे वरदान आहे तसेच शाप देखील आहे. माणसावर आहे की त्याने हे वरदान म्हणून वापरायचे आहे की शाप म्हणून वापरायचे आहेत. आपण असे म्हणू शकतो की विज्ञान मध्ये दैवीय शक्ती सह आसुरी शक्ती देखील आहे. जेवढे त्याने उद्योग सुधारले आहे तेवढेच रोजगार देखील हिसकवून घेतले आहे. लोकांचे धार्मिक आणि आध्यात्मिक विश्वास कमी होतं चाललं आहेत. पर्यावरण असंतुलित होतं चालले आहे. माणूस भोगविलासी बनत आहे. शारीरिक शक्ती कमी होतं चालली आहे. त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होतं आहे आणि ते आजाराला बळी पडत आहे.
जेथे विज्ञान माणसांसाठी वरदान आहे तेथे शाप देखील आहे. हे सर्वस्व माणसावर आहे की त्यांनी ह्याचा वापर वरदान च्या रूपात करावयाचा आहे की शापाच्या रूपात.