Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Gudi Padwa Essay: गुढीपाडवा निबंध

Gudi Padwa Essay: गुढीपाडवा निबंध
, सोमवार, 21 मार्च 2022 (16:21 IST)
Gudi Padwa Essay आपल्या देशात वर्षभरात अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकी गुढीपाडवा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे. महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे. गुढीपाडवा प्रामुख्याने महाराष्ट्रात हिंदू नववर्षाची सुरूवात म्हणून साजरा केला जातो. 
 
पाडवा म्हणजे प्रतिपदा आणि या दिवशी गुढी किंवा ब्रह्मध्वज उभारणे हे आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. महाराष्ट्र या राज्यासोबतच आंध्र प्रदेश आणि गोव्यासह दक्षिण भारतीय लोकही गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करतात.
 
या प्रकारे गुढी उभारली जाते
गुढी ही उंच बांबूपासून तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर तांबा किंवा चांदीचं भांडं बसविला जातं. गुढी नंतर पाटावर तांदूळ ठेवून उभी केली जाते. पाटाभोवती रांगोळी काढली जाते. या दिवशी हिंदू नववर्ष सुरू होते.
 
गुढी म्हणजे विजय चिन्ह. हा सण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात उगाडी आणि महाराष्ट्रात गुढी पाडवा म्हणून ओळखला जातो. 
 
महत्तव
* चैत्र महिन्यातील या तिथीनुसार सर्व युगांतील सतयुगाची सुरुवातही याच तिथीपासून झाली असे मानले जाते. असे म्हटले जाते की गुढीपाडव्याचा दिवस निश्चित करण्यापूर्वी, प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांनी त्यांच्या संशोधनानुसार, भारतीय पंचाग रचले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचे दिवस, महिने आणि वर्षांची गणना केली आणि त्यानुसार चैत्र महिना प्रतिपदेचा गुढी पाडवा आहे.
 
* हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हे साडेतीन मुहूर्त म्हणजे गुढी पाडवा, अक्षय्य तृतीया आणि दिवाळी पाडवा आणि दसरा हा अर्धा मुहूर्त मानला जातो.
 
* असे मानले जाते की रामायण काळात गुढीपाडव्याच्या दिवशी श्री रामजींनी वानरराज बळीच्या अत्याचारातून लोकांना मुक्त केले तेव्हा तिथल्या लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी घराघरात विजयाचा झेंडा फडकावला होता.
 
* असे मानले जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली.
 
* शालिवाहन शकाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी झाली असे मानले जाते. 
 
चविष्ट पदार्थ
महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशीचे आरोग्यासाठीही फायदेशीर असे पदार्थ नैवेद्य म्हणून तयार केले जातात. पुरणपोळी, श्रीखंड, पुरी, तसेच इतर पदार्थांचा बेत केला जातो.
 
कडुलिंबाचे महत्त्व
या दिवशी कडुलिंबाचे खास महत्त्व असल्याचे सांगितलं जातं. या दिवशी गुढीला कडुनिंबांच्या कोवळ्या पानांची डहाळी बांधली जाते. या दिवशी गोड पक्वान्नांसोबत कडुलिंबाची पाने खाण्याचीही परंपरा आहे. कडुलिंब आरोग्याला चांगले असते. तसेच या महिन्यात भरपूर उकाडा असतो. कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते.
 
चैत्र नवरात्र
या दिवशी चैत्र नवरात्र सुरू होते तसेच परंपरेनुसार घटस्थापना केली जाते. यादिवशी लोक फुलांनी आपली घरे सजवतात, अंगणात रांगोळी घालतात. गुढीपाडवा नवीन कपडे परिधान करतात. 
 
असा हा गुढीपाडवा सण आनंदाने साजरा केला जातो. आणि लोक एकमेकांना येणार्‍या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Relationship Tips: नवीन प्रियकराला हे 6 प्रश्न विचारू नका त्यामुळे ब्रेकअप होऊ शकते