Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

भारत कोकिला सरोजिनी नायडू

भारत कोकिला सरोजिनी नायडू
, मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 (11:45 IST)
'भारत कोकिला' नावाने प्रसिद्ध असलेल्या श्रीमती सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 ला हैद्राबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अघोरनाथ चट्टोपाध्याय होते. जे एक प्रसिद्ध वैज्ञानिक आणि शिक्षाशास्त्री होते. तसेच त्यांच्या आईचे नाव वरद सुंदरी होते. वरद सुंदरी या कवियित्री होत्या. त्या बंगाली भाषेत कविता लिहायच्या. सरोजनी नायडू यांनी वयाच्या 14 वर्षी सर्व इंग्रजी कवींच्या रचनांचे अध्ययन केले होते. 
 
सरोजनी नायडू यांना 1895 मध्ये हैद्राबादच्या निजाम ने त्यांना शिष्यवृत्तीवर इंग्लंडला पाठवले होते. सरोजनी नायडू या हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थिनी होत्या. त्यांना इंग्लिश, बंगाली, उर्दू , तेलगु आणि फारसी भाषा अवगत होत्या. वयाच्या 19 वर्षी सरोजनी नायडू यांचा विवाह डॉ. गोविंद राजालु नायडू यांच्या सोबत सन 1898 मध्ये झाला. त्यांनी घरीच इंग्रजी भाषेचे धडे घेतले. त्या वयाच्या 12 वर्षी मॅट्रीकची परीक्षा पास झाल्या. त्या शिक्षण पूर्ण करू शाकल्या नाही. पण इंग्रजी भाषेमध्ये काव्य सृजनमध्ये त्या प्रतिभावान होत्या. 
 
गीतिकाव्य शैली मध्ये सरोजनी नायडू ने काव्य सृजन केले होते. 1905, 1912 आणि 1917 मध्ये त्यांची कविता प्रसिद्ध झाली. 1906 मध्ये कोलकत्ता गोखलेंच्या अधिवेशनमध्ये भाषणात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभवली. त्यांनी महिलांना जागृत केले. कारण त्या वेळेला भारतीय समाजात कुप्रथा होत्या. भारताच्या स्वतंत्रतासाठी त्यांनी विविध आंदोलनात सहयोग दिला. खूप वेळेपर्यंत त्या काँग्रेसच्या प्रवक्ता होत्या. तसेच पुढे त्यांनी 1908 मध्ये 'कैसर-ए-हिन्द' सन्मान परत करून दिला कारण त्यांना जलियांवाला बाग हत्याकांड वर राग आला होता. भारत छोडो आंदोलन मध्ये त्यांना आगा खां महल मध्ये शिक्षा दिली गेली. त्या उत्तरप्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या. 
 
एक हुशार राजनेता होण्यासोबत त्या एक लेखिका पण होत्या. सरोजनी नायडू ह्या रविंद्रनाथ टैगोर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू तसेच इतर महापुरुषांना पण भेटल्या. 1914 मध्ये त्यांची पहिली भेट लंडन मध्ये महात्मा गांधींसोबत झाली. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वाने त्या प्रभावित झाल्या. दक्षिण अफ्रिकेत त्या गांधीजींच्या सहयोगी बनल्या. सरोजनी नायडू या गोपाळ कृष्ण गोखले यांना 'राजनितिक पिता' मानायच्या. त्यांच्या विनोदी स्वाभवामुळे त्यांना गांधीजींच्या लघु दरबारात विदूषक म्हंटले जायचे. 
 
एनी बेसेंट आणि अय्यर सोबत त्यांनी तरुणांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत करण्याच्या हेतुने त्यांनी 1915 ते 1918 पर्यंत भारत भ्रमण केले. तसेच सरोजनी नायडू या 1919 च्या सविनय अवज्ञा आंदोलन मध्ये गांधीजींच्या विश्वसनीय सहाय्यक होत्या. त्यानंतर होमरूल मुद्द्याला घेऊन त्या 1919 मध्ये इंग्लंड मध्ये गेल्या. व 1922 मध्ये त्यांनी खादीचे वस्त्र घालण्यचे व्रत घेतले. सरोजनी नायडू यांनी गांधीजींच्या अनेक सत्याग्रहात भाग घेतला. तसेच 'भारत छोड़ो' आंदोलनमध्ये त्या जेल मध्ये पण गेल्यात. 
 
1925 मध्ये भारतीय काँग्रेसच्या कानपुर अधिवेशनात प्रथम भारतीय महिला अध्यक्ष बनल्या. त्या उत्तरप्रदेशच्या पहिला महिला गवर्नर बनल्या. तसेच 'भारत कोकिला' म्हणून त्या ओळखल्या गेल्या. 29 सप्टेंबर 1929 मध्ये त्यांनी पंडित नेहरूंना पत्रात लिहिले की, भारतीय महिलां बद्द्ल म्हणाल्या की जर तुम्हाला तुमचा झेंडा सांभाळण्यासाठी कोणाची आवश्यकता असेल आणि तुम्ही विश्वास अभावने ग्रस्त असाल तेव्हा भारतीय नारी तुमचा झेंडा सांभाळण्यासाठी तुमच्या सोबत असेल. 
 
2 मार्च 1949 ला वय 70 वर्ष ह्रदय विकारच्या झटक्याने सरोजनी नायडू या अनंतात विलीन झाल्या. वयाच्या 13 व्या वर्षी त्यानी 1300 ओळींची 'द लेडी ऑफ लेक' कविता लिहली होती. तसेच फारसी भाषेमध्ये 'मेहर मुनीर' हे नाटक लिहले. 'द बर्ड ऑफ टाइम', 'द ब्रोकन विंग', 'नीलांबुज', ट्रेवलर्स सांग' ही त्यांची प्रकाशित पुस्तकें आहेत. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय तटरक्षक दलात भरती ; 12वी उत्तीर्णांना नोकरीची मोठी संधी