साहित्य-
काजू- 500 ग्रॅम
पुदीना पावडर- 3 चमचे
चाट मसाला- 2 चमचे
चवीनुसार सेंधव मीठ
लोणी- 2 चमचे
कृती-
नमकीन काजू तयार करण्यासाठी सर्वात आधी काजू स्वच्छ करुन घ्या.
आता एका बाउलमध्ये काजू आणि लोणी घाला. चांगल्याप्रकारे मिसळून घ्या.
आता यात जरा सेंधव मीठ घाला आणि ओव्हनला कन्वॅक्शन मोडवर प्रीहीट करुन काजू 10 मिनिटांसाठी बेक करा.
नंतर हे बाउलमध्ये काढा आणि इतर सामुग्री टाकून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या.
आता आपले बेक्ड मसाला काजू तयार आहे. आपण हे चहासोबत सर्व्ह करु शकता आणि एअर टाइट कंटेनरमध्ये स्टोअर देखील करु शकता.