सध्या श्रावण चालू आहे. अनेक जण उपवास करतात. पण अनेक वेळेस प्रश्न पडतो की, उपासाला नक्की बनवावे काय? याकरिता आज आपण एक उपवासाची नवीन डिश पाहणार आहोत. साबुदाणा पासून क्रिस्पी फ्रेंच फ्राईज बनवू या. चला जाणून घ्या रेसिपी
साहित्य-
एक कप साबुदाणा
दोन बटाटे
अर्धा चमचा जिरे पूड
मिरे पूड
कोथिंबीर
कापलेली हिरवी मिरची
सेंधव मीठ
उपवासाचे तेल
कृती-
सर्वात आधी साबुदाणा मिक्सरमधून बारीक करून घ्यावा. आता ही पावडर बाऊलमध्ये काढून त्यामध्ये दाण्याचा कूट, जिरे, कोथिंबीर, हिरवी मिरची, मिरे पूड, सेंधव मीठ घालावे.
आता बटाटा सोलून घ्या. व किसून स्वच्छ पाण्याने धुवून बनवल्या मिश्रणामध्ये घालावे. आता सर्व मिक्स करून गोळा बनवून घ्या. आता बटर पेपरवर ठेऊन कवर करवून लाटण्याच्या मदतीने पसरवून घ्या. मग याला लांब आणि आयताकार कापावे.
आता एका कढईमध्ये तेल गरम करून क्रिस्पी होइसपर्यंत तळून घ्या. तर चला तयार आहे आपले साबुदाणा क्रिस्पी फ्रेंच फ्राईज. तुम्ही हे हिरवी चटणी सोबत सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik