Marathi Biodata Maker

कच्चा पपईचा हलवा जाणून घ्या रेसिपी

Webdunia
सोमवार, 4 मार्च 2024 (18:20 IST)
तुम्ही कधी कच्चा पपईचा हलवा बनवाला आहे का? कच्चा पपईचा हलवा हा खूप स्वादिष्ट लागतो आणि आरोग्यासाठी देखील चांगला असतो. चला जाणून घेऊ या कच्चा पपईचा हलवा कसा बनवायचा   रेसिपी
साहित्य
1 कच्ची पपई(मीडियम साइज ची)    
250 ग्रॅम दूध 
1 छोटा चमचा खोबऱ्याचा किस  
10-15 किशमिश, काजू आणि बादाम 
1 कप गूळ 
पाव चमचा वेलची पूड 
शुद्ध देशी तूप आवश्‍यकतानुसार     
 
कृती 
सर्वात आधी कच्ची पपई धुवून घ्यावी. मग तिचे साल काढून तिला कापावी व त्यातील बिया काढून घ्या. आता पपई किसुन घ्यावी. एका कढईत तूप गरम करून त्यात किसलेली पपई टाका. नरम होईपर्यंत परतवून घ्यावे. पपई चांगली परतवून झाल्यावर त्यात दूध टाकावे. व घट्टपणा येईपर्यंत शिजवावे. आता एका दुसऱ्या पातेलित पाणी गरम करून गूळ टाकावा व त्याचा पाक तयार करून घ्यावा. पपईचा किस शिजल्यावर  त्यात गुलाचा गूळाचा पाक टाकावा आता हे मिश्रण चांगले शिजवून घ्यावे. मग यात किशमिश, काजू आणि बादाम, वेलची पूड मिक्स करून हलवावे. हा हलवा तुम्ही उपासाला देखील खाऊ शकतात.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

AI घेईल का तुमची नोकरी? २०२६ मध्ये काय बदलणार आहे?

फिश स्पाचे दुष्परिणाम जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 27 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2025

Marathi Mhani मराठी म्हणी व अर्थ

Shri Yamuna Aarti श्री यमुना आरती

सर्व पहा

नवीन

स्वयंपाकघरातील छोट्या गोष्टींनी आरोग्य कसे सुधारते

जप, ध्यान आणि श्लोकांचा वैज्ञानिक फायदा

फेस्टिव्ह स्वीट–कस्टर्ड ॲपल पुडिंग, १५ मिनिटांत तयार!

तिमिरातुनी तेजाकडे...

मधुमेहात FDC म्हणजे काय? भारतीय रुग्णांसाठी हाय CV रिस्कवर परिणामकारक!

पुढील लेख
Show comments