Marathi Biodata Maker
✕

संकष्टी चतुर्थी विशेष उपवासात बनवा शरीराला थंडावा देणाऱ्या थंडगार रेसिपीज

Webdunia
शनिवार, 4 एप्रिल 2026 (14:00 IST)
संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने उपवासाला तेच तेच साबुदाणा वडे किंवा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल, तर शरीराला थंडावा देणाऱ्या या खास रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करू शकता.  
 

रताळ्याची थंडगार खीर

रताळे पचायला हलके आणि ऊर्जा देणारे असतात. ही खीर फ्रिजमध्ये ठेवून थंड खाल्ल्यास अप्रतिम लागते.

साहित्य: २ उकडलेली रताळी, अर्धा लिटर दूध, साखर (किंवा गूळ), वेलची पूड आणि ड्राय फ्रूट्स.

कृती-
1. दूध आटवून थोडे घट्ट करून घ्या.
2. उकडलेली रताळी सोलून किसून घ्या किंवा स्मॅश करा.
3. दुधात रताळ्याचा किस आणि साखर घालून ५-७ मिनिटे शिजू द्या.
4. वरून वेलची पूड टाका आणि ही खीर २ तास फ्रिजमध्ये ठेवून थंड सर्व्ह करा.

राजगिरा फ्रूट कस्टर्ड

उपवासाला फळं खाणं नेहमीच चांगलं असतं. त्याला थोडा 'ट्विस्ट' देऊन तुम्ही कस्टर्ड बनवू शकता.

साहित्य: दुधात भिजवलेला राजगिरा (किंवा राजगिरा लाही), दूध, साखर, सफरचंद, केळी, डाळिंबाचे दाणे.

कृती-
1. दूध साखर घालून थोडे घट्ट गरम करा.
2. त्यात राजगिरा लाही किंवा शिजवलेला राजगिरा घालून मिक्स करा.
3. मिश्रण थंड झाल्यावर त्यात आवडीची फळे चिरून टाका.
4. थंडगार झाल्यावर फराळ म्हणून याचा आस्वाद घ्या.

दह्यातील साबुदाणा

जर तुम्हाला खिचडीचा त्रास होत असेल (एसिडिटी), तर दही-साबुदाणा हा उत्तम पर्याय आहे.

साहित्य: भिजवलेला साबुदाणा, ताजे दही, बारीक चिरलेली हिरवी मिरची, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ (किंवा सैंधव मीठ).

कृती-
1. भिजवलेल्या साबुदाण्यात ताजे दही मिक्स करा.
2. त्यात दाण्याचा कूट, मिरची आणि मीठ घालून एकजीव करा.
3. वरून तुपाची आणि जिऱ्याची फोडणी दिली तर चव अधिकच वाढते.

काही टीप्स-
शहाळ्याचे पाणी: उपवासाच्या दिवशी डिहायड्रेशन टाळण्यासाठी शहाळ्याचे पाणी आवर्जून प्या.
वरीचे ताक: भगर खाताना सोबतीला जिरे टाकलेले थंड ताक घेतल्यास पोट शांत राहते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: अतिशय शाही आणि चविष्ट पदार्थ मावा साबुदाणा खीर रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: उपवासाचे स्वादिष्ट साबुदाणा धिरडे; रेसिपी लिहून घ्या

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

नेलपेंट काढण्यासाठी थिनरची गरज नाही; घरच्या घरी या सोप्या टिप्स करा ट्राय

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण हातावर दिसू शकतात,दुर्लक्ष करू नका

फायनान्समध्ये एक्झिक्युटिव्ह एमबीए कोर्स करून करिअर बनवा संपूर्ण माहिती जाणून घ्या

Bhaubeej 2026 Wishes In Marathi भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी

पुढील लेख
Show comments