साहित्य-
शिंगाड्याचे पीठ - 1 कप
उकडलेले बटाटे - 2
चवीनुसार सेंधव मीठ
मिरे पूड - 1/2 चमचा
कोथिंबीर - 2 चमचे बारीक चिरलेली
हिरवी मिरची - 2 बारीक चिरलेली
तेल- तळण्यासाठी
कृती-
सर्वात आधी मोठ्या बाऊलमध्ये शिंगाड्याचे पीठ घ्या. त्यात मॅश केलेले बटाटे, सेंधव मीठ, मिरी पूड, हिरवी कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालावी. हे साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स करून पीठ मळून घ्या. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून मऊ बनवून घ्या.
आता पिठाचे छोटे गोळे बनवावे. हे गोळे गोल पुरीच्या आकारात लाटून घ्यावे. तसेच कढईत तेल गरम करून पुऱ्या तळून घ्याव्या. पुरी सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळावी. पुऱ्या तळल्यानंतर जास्तीचे तेल काढण्यासाठी टिश्यू पेपरचा उपयोग करा. तर चला तयार आहे आपली शिंगाड्याची पुरी जी तुम्ही दही, चटणी किंवा बटाट्याच्या भाजी सोबत सर्व्ह शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik