Article Fengsui Article %e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a4%a4%e0%a5%87 %e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%aa 107100300002_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संत्र्याचे वाढते रोप

संत्र्याचे वाढते रोप
झाडे आपल्या भाग्याशी निगडीत असतात. म्हणूनच अनेकदा घराच्या परिसरात विविध झाडे लावली जातात. पण आपण लावतोय ती झाडे कोणती आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहे. पिकलेल्या फळांनी डवरलेले संत्र्यांचे किंवा लिंबांचे वृक्ष भाग्याचे आणि संपन्नतेचे प्रतीक मानले जाते. ही झाडे बहुधा घराच्या आणि कार्यालयाच्या दरवाजासमोरील भागात लावली जातात.

NDND
चमकदार सोनेरी रंगाची संत्री ही सोन्याचे प्रतीक आहेत आणि नवीन वर्षाच्या दरम्यान फळांनी डवरलेले संत्र्याचे झाड हे अत्यंत उत्कृष्ट भाग्याचे प्रतीक मानले जाते. आपल्या बागेच्या आग्नेय दिशेच्या कोपर्‍यात संत्र्याचे रोपटे लावावे. कारण आपल्या घरातील हा भाग संपत्तीचे सूचक आहे. या कोपर्‍यात संत्र्याचा निकोप आणि फळे देणारा वृक्ष असणे, हे अत्यंत शुभ मानले जाते.

संपत्तीत वाढ होण्यासाठी घरात किंवा फ्लॅटमध्ये आग्नेय दिशेला (म्हणजेच संपत्तीच्या प्रभावक्षेत्रात) संत्र्याचे कृत्रिम रोपटे ठेवावे. आजकाल बाजारात आपल्याला संत्र्याची इतकी सुंदर कृत्रिम रोपे सहजतेने मिळू शकतात, जी संत्र्यांच्या जिवंत झाडाप्रमाणे सुंदर दिसतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi