2018 चा फिफा वर्ल्ड कप...अर्जेंटिना आणि फ्रान्सदरम्यान रशियातल्या कझान एरिना स्टेडिअममध्ये रंगलेला सामना...हा तोच सामना होता, ज्यामुळे अर्जेंटिनाचं वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं.
या सामन्यानंतर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला कठोर टीकेला सामोरं जावं लागलं. दुसरीकडे फ्रान्सच्या 19 वर्षाच्या खेळाडूची चर्चा सुरू झाली. त्याला फुटबॉलचा पुढचा स्टार म्हटलं जाऊ लागलं. त्याचं नाव होतं किलियन एम्बापे.
अर्जेंटिना हा सामना 4-3 अशा फरकाने गमावला. फ्रान्सच्या या विजयात महत्त्वाची भूमिका होती एम्बापेची.
एम्बापेची खासियत आहे त्याचा वेग. तो एवढ्या वेगाने पळतो की, प्रतिस्पर्धी टीमचे डिफेंडर्स हतबल होऊन जातात. त्याचा धावण्याचा वेग जवळपास ताशी 35 किलोमीटर आहे.
एम्बापेच्या वेगाला आव्हान देणारेही आहेत, पण त्याच्याकडे वेगाबरोबरच गोल करण्याचं एक किलर इन्स्टिंक्टही आहे.
एम्बापेची तुलना ब्राझीलचे फुटबॉलपटू पेलेंसोबत केली जाऊ लागली. पेलेंनी वयाच्या 17 व्या वर्षीच 1958चा वर्ल्डकप गाजवला होता.
आज चार वर्षांनंतर एम्बापेने आपली पेलेंसोबत होणारी तुलना योग्य असल्याचं सिद्ध केलं.
फ्रान्सने रविवारी (4 डिसेंबर) वर्ल्ड-कपच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पोलंडला 3-1 फरकानं हरवलं. एम्बापेनं या मॅचमध्ये एकापाठोपाठ एक दोन गोल केले. एक 74 व्या मिनिटाला आणि एक 90 व्या मिनिटाला.
फ्रान्सच्या टीमने झिनेदिन झिदान, मिशेल प्लातिनी, थिऑरी ऑन्री, जस्ट फॉन्टेन असे एकाहून एक सरस खेळाडू दिले आहेत. मात्र, यावेळी वर्ल्डकपमध्ये जीरू आणि एम्बापे हे फ्रान्सच्या टीममधले दोन असे खेळाडू आहेत जे फॉर्ममध्ये आहेत. पण मैदानात एम्बापेची जादू काही वेगळीच चाललीये. पोलंडविरूद्धच्या सामन्यात एम्बापेनं स्वतः तर दोन गोल केलेच, पण पहिला गोल करण्यात ऑलिव्हियर जीरूलाही मदत केली.
मॅजिकल मॅच फिनिशर
सामन्याच्या शेवटच्या मिनिटांमध्ये गोल करण्याचं कौशल्य एम्बापेकडे आहे.
2018 मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या फ्रान्सने क्रोएशियाला 4-2 ने हरवलं होतं. या सामन्यात एम्बापेनं 65 व्या मिनिटाला केलेला गोल हा फिनिशर ठरला.
रविवारी (4 डिसेंबर) पोलंडविरुद्ध दोन करणारा एम्बापे वर्ल्ड कपमध्ये 9 गोल करणारा खेळाडू बनला आहे. MAGES
ही गोलसंख्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या वर्ल्ड कपमधली गोल संख्येपेक्षा जास्त आहे आणि लिओनल मेस्सीच्या रेकॉर्डची बरोबरी आहे. मेस्सीने वर्ल्ड कपच्या 23 सामन्यांमध्ये आतापर्यंत 9 गोल केले आहेत.
2018 मध्ये आपला पहिला वर्ल्ड कप खेळणाऱ्या एम्बापेनं त्या स्पर्धेत चार गोल केले होते. त्याने आपला पहिला गोल पेरूविरुद्ध केला होता. त्याचबरोबर वर्ल्ड कपमध्ये गोल करणारा फ्रान्सचा तो सर्वांत लहान खेळाडूही ठरला.
कतार वर्ल्ड कपमध्ये एम्बापेनं पहिला गोल ऑस्ट्रेलियाविरूद्ध केला. डेन्मार्कविरुद्धच्या सामन्यातही त्याचा फॉर्म कायम राहिला. फ्रान्सने डेन्मार्कवर 2-1 ने विजय मिळवला. या सामन्यातील दोन्ही गोल एम्बापेने केले होते.
ट्यूनिशियाविरुद्धच्या मॅचमध्ये फ्रान्स 0-1 नं पराभूत झाला. या सामन्यात फ्रान्सच्या कोचने एम्बापेला बदली खेळाडू म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला.
नुकत्याच झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एम्बापेने म्हटलं की, त्याला वर्ल्ड कपचं वेड आहे आणि सलग दुसऱ्यांदा जगज्जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याची त्याची इच्छा आहे.
त्याने म्हटलं, “ही माझ्या स्वप्नातली स्पर्धा आहे. मला यात खेळायला मिळतंय हे माझं भाग्य आहे. मी पूर्ण सीझन स्वतःला यासाठी शारीरिक आणि मानसिकरित्या तयार केलं आहे. आता या स्पर्धेत रंगत येतीये. पण आमचं ध्येय वर्ल्ड कप जिंकणं आहे. त्यापासून आम्ही अजून दूर आहोत.” या स्पर्धेत एम्बापेने एकूण पाच गोल केले आहेत. मेस्सीने तीन तर ख्रिस्तियानो रोनाल्डोने एकही गोल केला नाहीये.
एम्बापे आणि बेलिंघम आमनेसामने येतील तेव्हा...
रविवारी (4 डिसेंबर) फ्रान्स आणि इंग्लंडदरम्यान वर्ल्डकपचा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना होईल. या सामन्यात सर्वांची नजर असेल 23 वर्षांचा एम्बापे आणि इंग्लंडचा 17 वर्षांचा मिड-फिल्डर ज्यूड बेलिंघमवर.
दोन्ही खेळाडू स्वतःच्या फॉर्मच्या जोरावर आपापल्या टीमला उपांत्यपूर्व फेरीत घेऊन आले आहेत.
फुटबॉलमधील जाणकार 17 वर्षांच्या बेलिंघमला सध्याचा सर्वोत्तम मिड-फिल्डर मानतात.
सेनेगलविरुद्ध झालेल्या सामन्यात मध्यांतराच्या ठीक आधी बेलिंघमने जॉर्डन हेंडरसन आणि हॅरी केन यांचा गोल करण्याचा मार्ग सुकर करून दिला. अशावेळी जेव्हा उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्स आणि इंग्लंडच्या टीम जेव्हा ग्राउंडवर उतरतील, तेव्हा ज्या दोन खेळाडूंवर जगभरातील फॅन्सची नजर असेल, ते एम्बापे आणि बेलिंघम असतील.
Published By- Priya Dixit