Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2.0 review: चित्रपट परीक्षण

Webdunia
भारतीय सिनेमा इतिहासामध्ये सर्वात महाग चित्रपट 2.0 यात प्रेक्षकांना तो रजनीकांत बघायला मिळाला जो मागील काला आणि कबाली यात शोधण्याच्या प्रयत्नात होते. रजनीकांतच्या सिनेमाकडून असलेल्या अपेक्षा यात पूर्ण झाल्या आहे. पैसा वसूल तर सोडा दिलेल्या किमतीपेक्षा अधिकपटीने मनोरंजन मिळेल याची खात्री आहे.
 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा चित्रपट थ्री-डी व्हर्जनमध्ये बघावा. या व्हर्जनमुळे आपला मजा अनेकपट वाढेल. आतापर्यंत भारतात या प्रकाराची उत्कृष्ट थ्री-डी फिल्म आलेली नाही. दिग्दर्शक शंकरद्वारे 2.0 ला थ्री-डी फॉर्मेटमध्ये भारतीय प्रेक्षकांच्या आवडीप्रमाणे चित्रीकरण केले गेले आहे.
 
543 कोटी बजेटमध्ये चित्रपटात तयार झाले आहे. पाण्यासारखा वाहिलेला पैसा म्हणून कहाणी आणि रजनी याहून अधिक लक्ष व्हीएफएक्सचे स्तर काय आहे यावर जातं? आणि एका शब्दाच सांगायचे तर - अद्भुत. व्हीएफएक्सचा शानदार प्रयोग बघून प्रेक्षक हैराण होतील.
 
पूर्ण चित्रपटात व्हीएफएक्सचा एवढा वापर केला गेला आहे की प्रेक्षक मनसोक्त मजा घेऊ शकेल. एकाहून एक सीन भरपूर मनोरंजन करतात. 
 
आता बोलू या कहाणीबद्दल. चेन्नईत अचानक लोकांचे मोबाइल फोन गायब होऊ लागतात. मोबाइल टॉवर ध्वस्त होऊ लागतात. पोलिस आणि सेना अयशस्वी होते अशात आठवतो वासीगरन (रजनीकांत). वासीगरनाल कळून जातं की त्याचा सामना अत्यंत बलशाली बर्डमॅन (अक्षय कुमार) यासोबत आहे. अनेक अडचणींनंतर तो चिट्टी (रजनीकांत) ची मदत घेऊन लढाई लढतो.
 
बर्डमॅन कोण आहे? तो असं का करतोय? कशा प्रकारे चिट्टी, वासीगरन आणि नीला (एमी जैक्सन) बर्डमॅनचा सामना करतात हे सिनेमात दर्शवले गेले आहे.
 
सामान्यात: अशा प्रकाराच्या चित्रपटात इमोशन्स नसतात परंतू 2.0 आपल्याला इमोशनल करते. तरी सिनेमातील चमत्कृत करणारे दृश्य आणि महानायक रजनीकांतपुढे कॉमेडी आणि रोमांस टिकत नाही. काही जागी कहाणी कमजोर पडते. पुढे काय होणार याचा अंदाज बांधणे कठिण नाही तरी फास्ट ट्रेक्समुळे विचार करायला वेळच मिळत नाही.
 
अक्षय कुमारचे फॅन्स निराश होऊ शकतात कारण इंटरवलपर्यंत अक्षय दिसत नाही आणि त्याची भूमिका लहानच आहे म्हणायला हरकत नाही. 
 
दिग्दर्शकाने भारतीय प्रेक्षकांची मात्र पुरेपूर काळजी घेतली आहे. शंकरने त्यांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या मोठ्या बजेटच्या सिनेमात प्रत्येक वर्गाच्या प्रेक्षकांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 
 
कहाणी आणि व्हीएफएक्स व अॅक्शन दृश्य भारतीय प्रेक्षकांना लक्षात ठेवून प्रस्तुत केले गेले आहे. लार्जर देन लाइफ सिनेमात अपेक्षित सर्व काही या चित्रपटात आहे. क्लाइमॅक्समध्ये फाइट दृश्य शानदार आहे. पूर्ण चित्रपटात प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात सिनेमा यशस्वी ठरला.
 
पूर्ण चित्रपटात सुपरस्टार रजनीकांतचा जादू बघायला मिळतो. चिट्टी 2.0 भूमिकेत देखील त्यांचे काम मजेदार आहे. चित्रपटात एक संवाद आहे की नंबर वन आणि टू तर मुलांचा खेळ आहे, मी तर वन अँड ओनली आहे आणि सिनेमा त्यांचा स्टारडमला सिद्ध करते.
 
एमी जॅक्सन सुंदर दिसली आहे. अक्षयची भूमिका लहान परंतू प्रभावशाली आहे. एआर रहमान यांचं संगीत जबरदस्त आहे. प्रभावशाली थ्री-डी इफेक्ट, शानदार व्हीएफएक्स आणि सुपरस्टार रजनीकांत हे कारण चित्रपट बघण्यासाठी पुरेसे आहे.
 
निर्माता : ए. सुभासकरन
दिग्दर्शक : एस. शंकर
संगीत : ए.आर. रहमान
कलाकार : रजनीकांत, अक्षय कुमार, एमी जैक्सन, सुधांशू पांडे, आदिल हुसेन
सेंसर सर्टिफिकेट : यूए * 2 घंटे 30 मिनिट 6 सेकंड * डब * 3 डी
रेटिंग : 4/5

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

रेड 2' च्या यशा दरम्यान ईदला प्रदर्शित होणार अजय देवगणचा चित्रपट

नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जाणारा युरोपमधील एक छोटासा देश पोलंड

लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

पुढील लेख
Show comments