चित्रपटाचे नाव : हाफ गर्लफ्रेंड
डायरेक्टर: मोहित सुरी
स्टार कास्ट: अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर, विक्रांत मस्सी, रिया चक्रवर्ती, सीमा बिस्वास
अवधी: 2 तास 15 मिनिट
सर्टिफिकेट: U/A
रेटिंग: 2 स्टार
रायटर चेतन भगतचे नॉवेल 'हैलो', 'काय पो चे', '3 इडियट्स', आणि '2 स्टेट्स' सारखे चित्रपट तयार करण्यात आले आहे, ज्यात बर्याच चित्रपटांना यश मिळाले आहे. एकदा परत चेतनचे नॉवेल 'हाफ गर्लफ्रेंड' वर चित्रपट तयार करण्यात आले आहे, यात बिहारचा मुलगा आणि दिल्लीच्या मुलीची कथा आहे. चित्रपटाला 'आशिकी 2' आणि 'एक विलेन' सारखे हिट चित्रपट देणारे मोहित सुरीने डायरेक्ट केले आहे.
कथा :
ही कथा बिहारच्या बक्सर जिल्ह्याचे डुमरांव गावात राहणार्या माधव झा (अर्जुन कपूर)ची आहे जो गावातून दिल्लीत शिक्षण घेण्यासाठी येतो तेथे त्याची भेट रईस घराण्याची मुलगी रिया सोमानी (श्रद्धा कपूर)शी होते. माधव आणि रिया दोघांना बास्केटबॉल खेळणे फार पसंत आहे. बास्केटबॉल कोर्टावर दोघांची भेट होऊ लागते. माधवला इंग्रजी येत नाही ज्यामुळे सारखे सारखे त्याचे मजाक उडवले जाते. माधवचा मित्र शैलेश (विक्रांत मस्सी) नेहमी त्याचा साथ देतो.
एक दिवस असे काही घडते, ज्यामुळे माधव आणि त्याची हाफ गर्लफ्रेंड रियामध्ये दुरावा निर्माण होतो. आणि माधव आपल्या गावाकडे परततो व रिया दूर निघून जाते. नंतर कथेत ट्विस्ट आणि टर्न्स येतात व एकदा परत माधव आणि रियाची भेट वेग वेगळ्या परिस्थितीत होते.
का नाही बघावा चित्रपट :
चित्रपटाची कथा फारच कमजोर आहे. स्क्रीनप्ले देखील ठीक आहे ज्याला अजून उत्तम बनवू शकत होते. जी गोष्ट चेतन भगतच्या 2 स्टेट्स आणि 3 इडियट्स सारख्या चित्रपटांमध्ये होती, ती येथे बिलकुलच बघायला मिळत नाही आहे.
चित्रपटाचे संवाद देखील फार कमजोर आहे आणि रोमांस, ड्रामामध्ये देखील काही खास नाही आहे. या चित्रपटात कोणत्या पात्राला काय म्हणायचे आहे ते सांगण्यात तो काही केल्या यशस्वी ठरत नाही.
चित्रपटाचे गीत 'फिर भी तुमको चाहूंगा' लोकांच्या कानापर्यंत पोहोचले आहे. मोहित सुरीच्या चित्रपटांमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे संगीत असतात, जे अधिक उत्तम बनू शकत होते.
का बघावे चित्रपट :
चित्रपटात अर्जुन कपूरने बिहारी मुलाची भूमिका फारच उत्तमरीत्या पार पाडली आहे. तो आपल्या भूमिकेत पूर्णपणे रमलेला दिसत आहे. तसेच श्रद्धा कपूरने देखील ठीक ठाक काम केलं आहे. विक्रांत मस्सीचा काम सहज आहे आणि चित्रपटाच्या बाकी कलाकारांचे देखी काम चांगले आहे. तसेच चित्रपटाची लोकेशन देखील फार चांगली घेण्यात आली आहे. प्रेक्षकांना दिल्लीसोबत न्यूयॉर्क देखील चित्रपटात बघायला मिळेल.
विजुअलप्रमाणे चित्रपट चांगले आहे आणि बॅकग्राऊंड स्कोरपण कमालीचा आहे.