Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री गजानन महाराज भक्तांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

श्री गजानन महाराज भक्तांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
, मंगळवार, 8 जुलै 2025 (06:00 IST)
"जय गजानना | 
ज्ञानांबरीच्या नारायणा | 
अविनाशरुपा आनंदघना | 
परात्परा जगत्पते ||
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
गण गण गणात बोते
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
संकटातून तारत असे, 
विघ्ने दूर सारत असे, 
शेगावीचा गजानन भक्तांवर 
नेहमीच माया करत असे
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
शेगावीचा राणा, ब्रह्मज्ञानी, भक्तवत्सल गजानन महाराज; 
म्हणा, गण गण गणात बोते!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
॥ अनंत कोटी ॥
॥ ब्रह्मांड नायक ॥
॥ महाराजाधिराज ॥
॥ योगीराज ॥
॥ परब्रम्ह॥
॥ सच्चीदानंद ॥
॥ भक्तप्रतिपालक ॥
॥ शेगावनिवासी ॥
॥ समर्थ सदगुरू ॥
॥ श्री संत गजानन महाराज की जय ॥
!! गण गण गणात बोते !!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना॥”
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
जसे हनुमानाच्या हृदयात श्रीराम आहेत
तसे माझ्या हृदयात श्री गजानन महाराज आहेत
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
फळा आले जन्मोजन्मींचे पुण्य,
लाभले जीवनी गुरु गजानन
जरी कुडी माझी दुजे गावी,
प्राण माझा गुरु चरणी शेगांवी
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
रक्षक तूंचि भक्तजनां
निर्गुण तूं परमात्मा तू
सगुण रूपात गजानन तू
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।
स्थिरचर व्यापुन उरलें जे या जगताशी ।
तें तूं तत्व खरोखर निःसंशय अससी ।
लीलामात्रे धरिलें मानवदेहासी ।
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा ।
करूनी गणि गण गणांत बोते या भजना ।
धाता हरिहर गुरूवर तूंचि सुखसदना ।
जिकडे पहावे तिकडे तूं दिससी नयना ।
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुरु पौर्णिमेला या प्रकारे करा शेगावातील गजानन महाराज यांचे पूजन