Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री गजानन महाराजाष्टक (दासगणूकृत)

Webdunia
गुरूवार, 22 फेब्रुवारी 2024 (08:43 IST)
गजानना गुणागरा परम मंगला पावना ।
अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।।
नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।।
 
निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करी ।
तुझी पतितपावना भटकलो वृथा भूवरी ।
विसंबत न गाय ती आपुलिया कधीं वांसरा ।
करी पदनातावरी बहु दया न रोषा धरा ।।२।।
 
अलास जगीं लावण्या परतुनी सु-वाटे जन ।
समर्थ गुरूराज ज्या भुषवि नाम नारायण ।।
म्हणून तुज प्रार्थना सतत जोडुनिया करा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।३।।
 
क्षणांत जल आणिले नसून थेंब त्या वापिला ।
क्षणांत गमनाप्रती करिसि इच्छिलेल्या स्थळा ।
क्षणांत स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।४।।
 
अगाध करणी तुझी गुरूवरा, न लोकां कळे।
तुला त्यजुनी व्यर्थ ते आचरितात नाना खुळे ।
कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।५।।
 
समर्थ स्वरूपप्रती धरून साच बाळापूरी ।
तुम्ही प्रगट जाहलां सुशिल बाळकृष्णा घरी ।
हरिस्वरूप घेऊनि दिधली भेट भीमातिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।६।।
 
सछिद्र नौकेप्रती त्वदिय पाय हे लागतां ।
जलांत बुडतां तरी तिजसी नर्मदा दे हाता ।
अशा तुजसि वाणण्या नच समर्थ माझी गिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।७।।
 
अतां न बहु बोलतां तव पदांबुजा वंदितो ।
पडो विसर ना कदा मदिय हेंचि मी मागतों ।
तुम्ही वरद आपुला कर धरा गणूच्या शिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।८।।
ALSO READ: श्री गजानन महाराज बावन्नी

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला सर्व शुभ कामे अबुझ मुहूर्तावर होतील, तारीख आणि महत्त्व जाणून घ्या

Anang Trayodashi 2025 आकर्षण वाढविण्यासाठी आणि प्रेमात यश मिळवण्यासाठी अनंग त्रयोदशी व्रत विधी आणि कथा

मारुतीला प्रिय आहेत या ४ राशी, सुख-समृद्धीची कधीच कमतरता भासत नाही

मारुतीच्या नावावरून मुलांची नावे

'दक्षिण कैलास' नावाने ओळखले जाणारे शंभू महादेव शिखर शिंगणापूर

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

पुढील लेख
Show comments