Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आले वाजत गाजत गणराज घरी

ganesh aarti
, शनिवार, 22 ऑगस्ट 2020 (05:34 IST)
आले वाजत गाजत गणराज घरी,
पुजनाची तुम्ही करावी तयारी,
मनोभावे करा, भालचंद्राचे पूजन,
एकवीस मोदक ठेवा नैवेद्य म्हणून,
जुडी दूर्वांची आवडे एकदंतासी,
फुल जास्वंदचे आवडे लंबोदरासी,
करा आरती, कुटुंबा समावेत,
वाजवुनी टाळ्या जल्लोष करत,
विघ्न हर्ता नेईल सर्व विघ्ने आता,
त्याचीच प्रचिती येईलच हो आता,
करा जयघोष, होऊनी उत्साहित,
विनायकाचे स्मरण, करा तुम्ही सतत!!
 
......अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ganesh Chaturthi 2020: गणेश स्थापना शुभ मुहूर्त जाणून घ्या