ganesh chaturthi

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ganesh Chaturthi 2025 : भगवान गणेशाला एकदंत का म्हणतात

ganpati
, सोमवार, 25 ऑगस्ट 2025 (11:49 IST)
भगवान गणेश हे हिंदू धर्मातील पहिले पूजनीय देवता आहेत. कोणताही धार्मिक विधी किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे.भगवान गणेशाची अनेक नावे आहेत, परंतु त्यापैकी एक म्हणजे एकदंत.
गणेशाचे एक दांत तुटल्याने त्यांना एकदंत म्हणतात. अखेर त्यांना हे नाव कसे मिळाले हे जाणून घ्या.
ALSO READ: जेव्हा श्री गणेशाने 7 बहिणींची परीक्षा घेतली
एका आख्यायिकेनुसार, भगवान गणेश आणि परशुराम यांचे युद्ध झाले. झाले असे की, एकदा परशुराम भगवान शंकराला भेटण्यासाठी गेले तेव्हा भगवान गणेशाने त्यांना आत भेटण्यासाठी जाऊ नाही दिले.
ALSO READ: Ganesh Chaturthi 2025 : गणपती आणि मूठभर तांदळाची खीर
या वर परशुराम संतापले आणि गणपतीला म्हणाले मला भगवान शंकराला भेटायला जाऊ दिले नाही तर तुला माझ्याशी युद्ध करावे लागेल. गणपतीने युद्धाचे आव्हान स्वीकारले. दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले. युद्धादरम्यान परशुरामांनी भगवान गणेशवर आपल्या परशुने हल्ला केला. या हल्ल्यात गणपतीचा एक दांत तुटला यामुळे त्यांना एकदन्त म्हटले गेले. 
भगवान गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. भगवान गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात. भगवान गणेशाला मोदक देखील अर्पण केला जातो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Hartalika Tritiya 2025 Puja Vidhi हरितालिका संपूर्ण पूजा विधी साहित्य आणि मंत्रासह