Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

गणपतीच्या उत्पत्तीचे गूढ, नक्की वाचा दुर्लभ गोष्ट

गणपतीच्या उत्पत्तीचे गूढ, नक्की वाचा दुर्लभ गोष्ट
, शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (12:05 IST)
गणपतीची गणना शंकराच्या गणात होते. गणपती हा शिव-पार्वतीचा पुत्र कसा झाला व त्याला गजमस्तक कसे जडले, या संबंधात पुराणकारांची एकवाक्‍यता नाही. 
 
त्याविषयी वेगवेगळ्या कथा आहेत.. तर जाणून घ्या गणपतीच्या उत्पत्तीचे गूढ

* गणपती हा केवळ शिवाचा पुत्र असल्याचे देखील मानले गेले आहे कारण शिवाने आपल्या तप आणि सामर्थ्याने एका तेजस्वी बालकाचा निर्माण केला. पार्वती अशा सुंदर पुत्राला बघून त्याला एकट्या शिवानेच जन्म दिल्याचा मत्सर करु लागली आणि मग तिने त्या बालकाला शाप देऊन बेडौल व गजमुख बनविले.
 
* शिव महापुराणानुसारदेवी पार्वतीने गणपतीच्या निर्माणाबाबत आपले विचार सखी जया आणि विजया यांच्यासमोर मांडले होते. तेव्हा सखी म्हणाल्या की नंदी आणि सर्व गण केवळ महादेवांच्या आज्ञांचे पालन करतात म्हणून आपल्यालाही एका अशा गणाची रचना करायला हवी ज्याने आपल्या आज्ञांचे पालन करावे. तेव्हा पार्वतीने आपल्या मळीपासून गणपतीची रचना केली होती.
 
* एकदा पार्वती स्नानगृहात स्नान करीत होती. त्या प्रसंगी आपल्या अंगाचा मळ काढून तिने एक पुरुष बनविला व त्याला स्नानगृहाच्या दारावर द्वाररक्षक म्हणून उभे केले. थोड्याचा वेळात शंकर तिथे आले व ते स्नानगृहात जाऊ लागले. द्वाररक्षकानेच त्याला अडवले. तेव्हा शिवाला त्याचा राग आला आणि त्याने त्याचे मस्तक उडविले. ही दुर्घटना पाहून पार्वतीला दु:ख झाले. मग तिच्या सांत्वनाकरिता शिवाने इंद्राच्या हत्तीचे मस्तक आणून त्या शिरहीन देहाला जोडले. 
 
* एकदा पार्वतीने शनीला गणपतीकडे पाहण्यास सांगितले. मात्र शनीच्या दृष्टीमुळे गणपतीचे मस्तक गळून पडले. तेव्हा पार्वती शोकाकुल होऊन ब्रह्मदेवाकडे याचना केली तेव्हा ब्रह्मदेवाने तुला प्रथम ज्या प्राण्याचे मस्तक आढलेल, ते तू गणपतीच्या देहाला लाव त्याने तो सजीव होईल असे सांगितले. त्यानुसार पार्वतीला सर्वप्रथम गजाचे मस्तक मिळाले. ते आणून तिने गणपतीच्या देहाला लावले.
 
* एकदा शिव पार्वती हिमालयात विहार करीत असताना त्यांना हत्तीचे जोडपे रतिक्रिडा करताना दिसले. तेव्हा शिव-पार्वतींनीही गजरूप घेऊन रतिक्रिडा केली त्यांना गणपती हा गजमुख पुत्र प्राप्त झाला.
 
* शिव हा फार प्राचीन काळी भूतान देशाचा एक प्रबळ राजा होता. या भूतानात सणावाराच्या दिवशी लोक निरनिराळे पशुपक्षी व अक्राळ-विक्राळ प्राण्यांचे मुखवटे घालून मिरवतात. त्यांच्या या पद्धतीतूनच पुढे त्यांच्या गणपतीला गजमुख प्राप्त झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रावणी शनिवार: अश्र्वत्थ-मारुती आणि नृसिंह पूजन विधी आणि महत्त्व