Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

गणेश गीता अध्याय ६

Shree Ganesh Geeta Aadhyay 5
(गीति)
 
गणपति म्हणे वरेण्या, सांगें तुजला प्रसिद्धसा योग ।
 
बुद्धीयोग असे हा, ऐकें राया सुयोग हा सांग ॥१॥
 
गणपति म्हणे तयाला, जरि तूं घेसी कळून मम तत्त्व ।
 
१.
 
माझी ओळख होतां, मुक्तीला पावशील तें तत्त्व ॥२॥
 
कळण्यास योग्य ऐसें, नाहीं दुसरें सुसाध्यसें इतर ।
 
२.
 
लोकहितास्तव तुजला, सांगतसें मी श्रवीं नृपा चतुर ॥३॥
 
आधीं प्रकृति माझी, जाणावी नी मलाहि जाणावें ।
 
३.
 
माझें ज्ञान तुला तें, होतां विज्ञानरुप धन पावे ॥४॥
 
अग्नी अकाश वायू, रवि शशि आणी अहंकृती चित्त ।
 
४.
 
बुद्धि नि होता हविही, एकादश मदिय प्रकृतीच त्यां असत ॥५॥
 
जीवित्याला पावे, व्यापक आहे त्रिलोकिं ती साची ।
 
प्रकृति आहे समजे, जन्मा येणें तसेंच मरणेंची ॥६॥
 
ऐसें बोलति मुनि हें, ऐकें राया मदीय वचनातें ।
 
५।६.
 
सृष्टि-स्थिति-लय-पालन, होतें हें माय-पुरुष युग्मातें ॥७॥
 
वर्णाश्रमधर्मानें, वर्ते जो वा स्वपूर्वकर्मानें ।
 
७.
 
ऐसा तो विरळा गत, जाणतसे मदिय तत्त्व यत्‍नानें ॥८॥
 
केवळ मजसी पाहे, अन्यत्रहि लक्ष देत न च जो तो ।
 
८.
 
यत्‍नें करुन माझें, दर्शन घेई सदैव योगी तो ॥९॥
 
जगतीं सुगंधरुपें, अग्नीमाजी सतेज रुपानें ।
 
९.
 
उदकीं रसरुपानें, सूर्याठायीं बघे प्रकाशानें ॥१०॥
 
येणेंपरि जो पाहे, बुद्धीदिक नी समस्त वस्तूंत ।
 
असती धर्म तसतसे, जाणे तो मदिय रुपसें बघत ॥११॥
 
माझेपासुन झाले, जनित असे ते विकार बा तीन ।
 
१०.
 
त्यांचे ठायीं मजला, पाहतसे योगिराज तो लीन ॥१२॥
 
मायेनें मोहित जे, पापीजन ते मला न ओळखती ।
 
११.
 
माझी तीन विकारी, प्रकृति ते तीन लोक भुलताती ॥१३॥
 
जो तत्त्व मदिय जाणुन, मुक्तहि होतो नृपावरा योगी ।
 
१२.
 
बहु जन्मांनीं जाणुन, मोहाला सोडितो असा योगी ।
 
जे अन्य देव भजती, ते जाति त्या तदीय लोकांस ।
 
ज्या बुद्धीनें मजसी, भजती त्यांची सुपूर्ण करि आस ॥१५॥
 
मी सर्वांना जाणें, परंतु मजला कुणीहि न जाणे ।
 
ऐसी जनरीतीही, कथितों भूपा तुला तिही जाणें ॥१६॥
 
अव्यक्त असा जो मी, व्यक्तहि होतां न जाणती मजला ।
 
१३।१४.
 
ते काम मोहव्यापक, असती मानव कथीत हें तुजला ॥१७॥
 
तैसेंच पापकर्मी, अज्ञानी असति त्यांस प्रत्यक्ष ।
 
१५.
 
न दिसे त्यांना मी कीं, जाणें भपा श्रवार्थ दे लक्ष ॥१८॥
 
जो भक्तियुक्त असुनी, मदीय स्मरुनी त्यजीतसे प्राण ।
 
१६.
 
त्याला मदिय कृपेनें, जन्म नसे आणखी नृपा जाण ॥१९॥
 
ज्या ज्या देवा स्मरतो, त्या त्या लोकाप्रतीच तो प्राणी ।
 
१७.
 
जातो भूपति ऐकें, मदिय असेही खरोखरी वाणी ॥२०॥
 
रुपें अनेक नटतो, रुचिर अशा त्या रुपास कीं ध्यावें ।
 
ज्यापरि अनेक सरिता, मिळती सिंधूस ऐक्यजल व्हावें ॥२१॥
 
 
कवणहि मार्गे जावें, ध्यावें मजला सुभक्तिनें नित्य ।
 
१८.
 
पावे मदीय स्थाना, हें जाणोनी सुबोधसा सत्य ॥२२॥
 
ब्रह्मा विष्णू शिव नी, इंद्रालाही भजोन त्या लोकीं ।
 
जातो परंतु परते, सरतां पुण्यास जनुन ये लोकीं ॥२३॥
 
भजतां मजला भावें, मज लोकाला त्वरीत ये भक्त ।
 
१९.
 
परते नच या लोकीं, राहे तेथें सदैव हो मुक्त ॥२४॥
 
जो भक्तीनें मजला, भजतो त्याचाच योग नी क्षेम ।
 
२०.
 
चालविं सदैव भूपा, हें आहे मदिय कार्य नी नेम ॥२५॥
 
मानव जन्मुन येतां, त्याला गति असति मुख्य या दोन ।
 
शुक्लगती नी दुसरी, गति आहे कृष्ण नाम या दोन ॥२६॥
 
शुक्लगतीनें होतो, मानव हा ब्रह्मरुप साचार ।
 
२१.
 
कृष्णगतीनें जन्मुन, पुनरपि करितो जगांत संचार ॥२७॥
 
षष्ठम अध्यायीं मीं, कथिला भूपा सुबुद्धि हा योग ।
 
आतां पुढती सांगें, नाम तयाचें उपासना योग ॥२८॥
 
षष्ठ प्रसंग काव्यें, तीं समजावीं सुरक्त सुमनेंच ।
 
ध्यावीं मानुन प्रिय हीं, प्रभुंनीं ऐसीं मदीय सुमनेंच ॥२९॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गणेश गीता अध्याय ५