Modak Recipe: गणपती बाप्पाच्या आगमनाची भक्त आतुरतेने वाट पाहत असतात. गणेश चतुर्थी आली की बाप्पाच्या आगमनात कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी महिनाभर आधीच तयारी सुरू केली जाते. बाप्पासाठी 10 दिवस वेगवेगळल्या पदार्थांचा नेवैद्य दिला जातो. मोदक बाप्पाला खूप आवडतात. बाजारात देखील मोदक मिळतात. लोक घरी बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक बनवतात. गूळ-नारळ, साखर -नारळ घालून मोदक करतात. यंदा घरीच बनवा शुगर फ्री मोदक हे चवीला देखील चांगले असतात आणि आरोग्यासाठी देखील चांगले असतात. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य -
तांदूळ पीठ - 1 कप
पाणी - 1 कप
मीठ
साजूक तूप- 2-3 चमचे
किसलेला गूळ – 1 वाटी
किसलेला नारळ - 1 वाटी
वेलची पावडर - 1/2 टीस्पून
चिरलेला काजू-बदाम
कृती -
यासाठी प्रथम एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात चिमूटभर मीठ टाका.
पाण्याला उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ घालून ढवळत राहा.
त्यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.
यानंतर काही वेळ झाकून ठेवा. नंतर त्यापासून मऊ पीठ बनवा.
आता काचेच्या भांड्यात ठेवा आणि काही वेळ तसेच राहू द्या.
सारण कसे करावे-
आता त्याचे सारण बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅन घ्या आणि त्यात साजूक तूप घाला.
त्यात साखरेऐवजी किसलेला गूळ घाला. ते शिजवा, जेव्हा त्यात बुडबुडे तयार होऊ लागतील तेव्हा किसलेले नारळ घाला.
आता ते घट्ट होईपर्यंत चांगले ढवळत राहा. सारण पॅन पासून सुटू लागेल.
आता त्यात चिरलेला सुका मेवा घाला .
नंतर गॅस वरून सारण काढून थंड होण्यासाठी ठेवा.
अशा प्रकारे मोदक बनवा -
हे बनवण्यासाठी आधी हातावर साजूक तूप लावा. हे लावल्याने पीठ चिकटत नाही.
नंतर पीठ घेऊन हाताच्या सहाय्याने गोल पुरी चा आकार द्या.
आता त्यात सारण घाला.
यानंतर एका टोकाला तूप लावून पिठाच्या कडा बंद करायला सुरुवात करा.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यासाठी मोदकाचा साचाही वापरू शकता.
अशा प्रकारे तुम्हाला सर्व मोदक तयार करावे लागतील.
बॉयलरमध्ये पाणी ठेवा आणि त्यात पाणी ओतल्यानंतर चाळणी ठेवा त्यावर सर्व केलेले मोदक ठेवा आणि ते वाफवून घ्या.
5 मिनिटे वाफवल्यानंतर मोदक तयार होतील.मोदकाचा नैवेद्य बाप्पाला द्या.
Edited by - Priya Dixit