Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री गणेशाच्या पूजेसाठी आवश्यक साहित्य, संपूर्ण यादी

Materials required for worship of Shri Ganesha
, गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (23:28 IST)
गणेश चतुर्थीला पार्थिव गणपतीची स्थापना केली जाते. घरगुती गणेशोत्सव हा परंपरेनुसार दीड, अडीच, पाच, सात आणि दहा दिवस साजरा केला जातो. यावेळी गणेश मूर्तीची परंपरेनुसार, विधीवत प्राणप्रतिष्ठा केली केली. गणपती पूजनासाठी खालील साहित्य हवे. 
 
गणपती मूर्ती, हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, अष्टगंध, 10 सुपार्‍या, 5-5 खारीक, बदाम, हळकुंड, अक्रोड, 1 रेशीम कापड, कापसाची वस्त्रे, 2 जानवी जोड, 1 पंचा, तांदूळ, तुळशी, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार, आंब्याच्या डहाळे, 2 नारळ, 5 फळे, 25 विड्याची पाने, कच्चे दूध, दही, शुद्ध तूप, साखर, मध 50 ग्रॅम, अक्षता, इत्राची लहान बाटली, पंचामृत, कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, सुटे पैसे, चौरंग, आसन, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर. या व्यतिरिक्त हात पुसण्यासाठी फडके, देवाचे अंग पुसण्यासाठी फडके, कापसाची वात, चार लहान वाट्या, चंदन, दूर्वा.
 
गणेश पूजनासाठी निषिद्ध वस्तू
तुळशी किंवा तुळशीचे पान गणपतीला अर्पण करत नाहीत.
गणपतीला एकच प्रदक्षिणा घाला.
घरात दोनपेक्षा अधिक मूर्ती नको.
गणपतीची जुनी किंवा तुटलेली मूर्ती ठेवू नका
अनेक दिवसात पूजा न केलेली मूर्ती ठेवणे निषिद्ध.
अपूर्ण दूर्वा अर्पण करू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुराणातील गणेश