Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनोकामना पूर्ण करण्यासाठी 8 उपाय

विघ्नहर्ता
यावर्षी सोमवारी, 5 सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून विघ्नहर्ता, बुद्धी प्रदाता, लक्ष्मी प्रदाता गणपतीला प्रसन्न करण्यासाठी याहून श्रेष्ठ वेळ नाही. आपल्या मनोकामना पूर्तीसाठी हे 8 उपाय करा आणि देवाचा आशीर्वाद मिळवा.

(1) श्वेतार्क- गणपती पूर्वाभिमुख होऊन रक्त वस्त्र आसन प्रदान करून यथाशक्ति पंचोपचार किंवा षोडषोपचार पूजन करून मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवून 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राने 21, 51 किंवा 108 माळा जपाव्या.
 
(2) शुभ कार्यासाठी किंवा कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी यथाशक्ति पूजन करून 'ॐ वक्रतुंडाय हुं' मंत्र जपावा. यासाठी प्रवाळाची माळ वापरावी.

(3) आकर्षक वशीकरणासाठी लाल हकीकची माळ वापरावी.
विघ्नहर्ता
(4) अडथळे दूर करण्यासाठी श्वेतार्क गणपतीसमोर 'ॐ गं ग्लौं गणपतये विघ्न विनाशिने स्वाहा' या मंत्राचा 21 माळा जपाव्या.

(5) शत्रूचा नाश करण्यासाठी कडुनिंबाच्या मुळाच्या गणपतीसमोर 'हस्ति पिशाचि लिखे स्वाहा' हा जप करावा. लाल चंदन, लाल रंगाचे फूल चढवावे. पूजन केल्यावर मध्य पात्रात स्थापित करून नित्य हे मंत्र जपावे.
विघ्नहर्ता
(6) शक्ती विनायक गणपती- या गणपतीची आराधना केल्याने व्यक्ती सर्वशक्तिमान होतो. त्याला जीवनात कोणत्याही प्रकाराची कमी जाणवत नाही. कुंभाराच्या मातीने अंगठ्यासमान आकाराची मूर्ती तयार करून षोडषोपचार पूजन करावे आणि 'ॐ ह्रीं ग्रीं ह्रीं' या मंत्राच्या 101 माळा जपून हवन करावे. दररोज या मंत्राच्या 11 माळा जपाव्या.

(7) लक्ष्मी विनायक गणेश- 'ॐ श्रीं गं सौम्याय गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।' नित्य 444 तरपण केल्याने गणपतीची कृपादृष्टी प्राप्त होते.
विघ्नहर्ता
8) कर्ज मुक्तीसाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी यथाशक्ति हवन करून ॐ गं लक्ष्म्यौ आगच्छ आगच्छ फट् या मंत्राने 108 माळा जपाव्या. नित्य 1 माळ जपावी, लवकरच कर्जापासून मुक्ती मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

असे झाले होते श्रीकृष्ण-बलरामाचे नामकरण संस्कार